ई कॉमर्स वेबसाइटवर चक्क बॉस, कलिगला ठेवलं विकायला! चीनी कर्मचाऱ्यांमध्ये हा ट्रेण्ड कसा सुरु झाला?

Chinese Employee Trend:  चीनी कर्मचाऱ्यांनी ऑफिसचा तणाव कमी करण्यासाठी अनोखा गोष्टीचा अवलंब केलाय. ज्याचा तुम्ही विचारही करु शकत नाही.   

Pravin Dabholkar | Updated: Jul 8, 2024, 08:46 AM IST
ई कॉमर्स वेबसाइटवर चक्क बॉस, कलिगला ठेवलं विकायला! चीनी कर्मचाऱ्यांमध्ये हा ट्रेण्ड कसा सुरु झाला? title=
Chinese Employee Frusted

Chinese Employee Trend: नोकरी कोणतीही असो, नोकरदार वर्गाला कधीतरी त्याचा त्रास होतो. कधी कामाचे तास वाढतात, कधी काम वाढत, पगार कमी मिळतो, बॉस किटकिट करतो तर कधी सहकर्मचारी त्रास देतात..अशा अनेक कारणांमुळे कर्मचारी कधी ना कधी तणावग्रस्त होतात. आपले शेजारी राष्ट्र चीनमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. पण चीनी कर्मचाऱ्यांनी यावर उत्तरदेखील शोधून काढलंय. असा मार्ग शोधलाय ज्याचा तुम्ही कधीही विचारही केला नसेल. 

सध्या अनेकजण काही वस्तू विकत घ्यायची असेल किंवा विकायची असेल तर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मची मदत घेतात. पण चीनी कर्मचाऱ्यांनी ऑफिसचा तणाव कमी करण्यासाठी याचा वापर केलाय. या देशातील कर्मचारी आपला बॉस, सहकारी आणि नोकरी सेकंड हॅण्ड ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवतात. 

नोकरीमध्ये येणारा तणावर कमी करण्यासाठी कर्मचारी अलीबाबा सेकंड हॅण्ड ई कॉमर्स प्लॅटफॉर्म 'जियान्यू'वर नोकरी आणि सहकर्मचाऱ्यांना विकत आहेत. चीनी कर्मचाऱ्यांना कामावर येणारा तणाव सहन होत नाही. हा तणावर कमी करण्यासाठी चीनी कर्मचारी असं करत असल्याचे म्हटले जात आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने यासंदर्भात वृत्त दिलंय. त्यानुसार काही 'नोकरी विक्रीला आहे' असा एक टॅग लावण्यात आलाय. यामध्ये लोकं 'त्रास देणारा बॉस', 'बेकार नोकऱ्या' आणि द्वेश करणारे सहकर्मचारी' अशी कॅटेगरी करण्यात आली आहे. एकाख्या नको असलेल्या वस्तू विकल्याप्रमाणे यांना विकलं जातंय. चीनी कर्मचारी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी यांची किंमत 4 लाख ते 9 लाख रुपयांपर्यंत ठेवली आहे.

नोकरी काढली विकायला

वेबसाइटवर एका यूजरने आपली नोकरी 91 हजार रुपयात विकायला काढली आहे. कंपनी मला दरमहिन्याला 33 हजार रुपये पगार देते. तसेच नोकरी विकत घेणाऱ्याचे पैसे 3 महिन्यात वसूल होतील असेही त्याने पुढे म्हटले आहे. 

सहकर्मचारीला घ्या विकत

मी एका सहकर्मचाऱ्याला 3 हजार 999 यूआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 45 हजार 925 रुपयांना विकू इच्छित आहे. या कर्मचाऱ्यापासून सुटका कशी मिळवायची? हे मी तुम्हाला सांगू शकतो. तसेच काम करताना तुम्ही 'बळीचा बकरा' कसे बनणार नाहीत, याच्या टीप्सही देईन, असे एका चीनी कर्मचाऱ्याने म्हटलंय. 

बॉस विकायला

तिसऱ्या एका कर्मचाऱ्याने आपला 'बेकार बॉस' 500 यूआन म्हणजेच 5 हजार 742 रुपयांना विकायला ठेवलाय. माझा बॉस मला सारखा टोकत असतो, सारखी माझ्यावर टीका करत असतो. त्याच्यामुळे मी खूप मानसिक तणावात असल्याचे त्याने म्हटले आहे.