बीजिंग : भुतानच्या दिशेने सिक्किम सेक्टरमध्ये डोकलाम भागात रस्ते बांधणी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय सैनिकाने रोखले. त्याच प्रकारे काश्मीरात तिसऱ्या देशाची लष्कर घुसू शखते असा इशारा चिनी विचार समुहाचे एक विश्लेषकाने दिला आहे.
चायना वेस्ट नॉर्मल युनिवर्सिटीमध्ये भारतीय अध्ययन केंद्राचे निदेशक लांग जिंगचुनने ग्लोबल टाइम्सला लिहिलेल्या आपल्या स्तंभात म्हटले की भारताने भूतानचे क्षेत्र वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असेल तर त्याने त्यांच्या क्षेत्रापुरताचा हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. वादग्रस्त भागात हा प्रयत्न करू नये.
भारताने भूतानची मदत केली तर या तर्काने पाकिस्तानने सरकारने विनंती केली तर भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरसह भारत पाक वादग्रस्त क्षेत्रात तिसऱ्या देशाचे सैन्य घुसू शकते.