Abortion Pills : कॉलेजने अचानक का केली गर्भनिरोधक गोळ्या वाटपाची घोषणा ?

कॉलेजमध्ये मिळणार गर्भनिरोधक गोळ्या,  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शैक्षणिक संस्थेचा मोठा निर्णय  

Updated: Oct 13, 2022, 02:47 PM IST
Abortion Pills :  कॉलेजने अचानक का केली गर्भनिरोधक गोळ्या वाटपाची घोषणा ? title=

Protest Against Supreme Court in America: शाळा आणि कॉलेजपासून विद्यार्थांना त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याबद्दल जागृत केलं जातं, शिवाय विद्यार्थ्यांमध्ये देखील अनेक विषयांवर मोकळपणाने चर्चा सुरु असते. ही गोष्ट भविष्यासाठी चांगले संकेत दर्शवत असले तरी, काही मुद्द्यांवरून घेतलेले निर्णय चर्चेचं कारण ठरतात. अमेरिकेतील एका कॉलेजमतून मुलींसाठी मोफत गर्भनिरोधक (Contraceptive Pills) गोळ्या वाटपाची घोषणा करण्यात आल्यामुळे सर्वत्र याबाबात चर्चा रंगल्या आहे. (Abortion Pills)

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मोठा निर्णय (American Supreme Court)
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला ज्यामध्ये, गर्भपात अमेरिकनची परंपरा आणि संविधानात याचा अधिकार नाही. या निर्णयासह सर्वोच्च न्यायालयाने पन्नास वर्षे जुना निर्णय रद्द केला. या निर्णयाचे अनेक प्रांतांनी पालन सुरू केले असले तरी अनेक ठिकाणी विरोधही झाला.

न्यूयॉर्कमधील (New York) गर्ल्स कॉलेजचा मोठा निर्णय
कोर्टातल्या निकालाच्या निषेधाच्या गर्ल्स कॉलेजने मोठी घोषणा केली आहे. न्यूयॉर्कमधील बर्नार्ड गर्ल्स कॉलेजने पुढील सत्रापासून विद्यार्थिनींना गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप करणार असल्याची घोषणा केली आहे. (Girls Right In School College)

शैक्षणिक संस्थेने घेतलेल्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला अनेक राज्यांनी विरोध केला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक राज्यांमध्ये खळबळ उडाली आहे.