Shakira : जॅमच्या बॉटलमुळे उघड झालं अफेअर; शकीराचं पार्टनरसोबत ब्रेकअप

प्रसिद्ध गायक शकिराने तिचा जोडीदार जेरार्ड पिक  सोबत ब्रेकअप केले आहे. झालं असं की तिला घरातील स्ट्रोबेरी जॅम कोणीतरी खाल्लेला दिसला आणि जेरार्ड पिक स्ट्रोबेरी जॅम आवडत नाही हे शकीरा माहित होतं, बस्स मग काय भावाचं अफेअर उघड झाले आणि मग ब्रेकअप. 

Updated: Jan 21, 2023, 06:25 PM IST
Shakira : जॅमच्या बॉटलमुळे उघड झालं अफेअर; शकीराचं पार्टनरसोबत ब्रेकअप title=

Shakira Gerard Pique Break Up: कोलंबियन पॉप स्टार शकीरा (Shakira) गाण्यांसह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. शकीराच्या आयुष्यात पुन्हा एक नविन वादळ आले आहे.  शकीरा तिचा माजी पती जेरार्ड पिक (Gerard Pique) यांचे ब्रेकअप झाले आहे. पिक याचे बाहेर अफेअर सुरु होते. जॅमच्या  बॉटलमुळे पिक याचे अफेअर उघड झाले. शहीराने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे (Break Up). 

जेरार्ड पिक हा अनेक दिवसांपासून शकीराची फसवणुक करत होता. त्याने आपले अफेअर शकीरापासून लपवून ठेवले होते. अखेरीस जॅमच्या बॉटलमुळे गेरार्ड पिक याचा भांडाफोड झाला असून, शकीराला त्याच्या अफेअरबाबत समजले.  शकीरा आणि जेरार्ड 2010 पासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघ दोन मुलांचे पालकही आहेत.  मात्र, आता त्यांनी विभक्त निर्णय घेतला आहे.  जेरार्डचे अफेअरमुळेच शकीराने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शकीराने जेरार्डजवळ एका मुलीचा फोटो पाहिला होता. तेव्हापासूनच तिला जेरार्ड याचे अफेअर असल्याचा संशय होता. मात्र, जेरार्ड मान्य करत नव्हता. अलीकडेच शकीरा मुलांसह टूरवर गेली होती. टूरवरुन घरी परतल्यावर घरातील स्ट्रोबेरी जॅमच्या बॉटलमधील कोणीतरी खाल्लेला दिसला.  जेरार्ड याला स्ट्रोबेरी जॅम आवडत नाही हे शकीराला माहित होते. मग, स्ट्रोबेरी जॅम खाल्ला कुणी? असा प्रश्न शकीराला पडला. तिने शोध घेतला असता जेरार्ड याच्या गर्लफ्रेंडने जॅम खाल्ल्याचे तिला समजले. जेरार्ड याचे अफेर उघड झाल्यानंतर शकीराने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. शकीरासह ब्रेकअप झाल्यानंतर जेरार्ड त्याची नविन गर्लफ्रेंड क्लारा चिया मार्टी सोबत पब्लीकली स्पॉट झाल्याचीही चर्चा आहे.

शकीरा जेरार्ड पेक्षा दहा वर्षांनी मोठी

शकीरा आणि जेरार्ड यांच्या वयात दहा वर्षाचे अंतर आहे. शकीरा ही तिचा पार्टनर जेरार्डपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. शकीराचा जन्म 1977 मध्ये कोलंबियात झाला. तर जेरार्ड पिकेचा जन्म 1987 सालातील आहे. जेरार्ड हा मुळचा स्पेनमधील बार्सिलोना शहरातील आहे. जेरार्ड पिक हा स्पॅनिश फुटबॉलर आहे.  2010 च्या फिफा विश्वचषकाचे अधिकृत गाणे वाका-वाका या गाण्याच्या शूटिंगदरम्यान शकीरा आणि जेरार्ड यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा पासून ते दोघे एकत्र आहेत.  शकीरा आणि जेरार्ड यांचे लग्न झाले नसताना त्यांना  दोन मुले आहेत.