बघा पाणबुड्यांच्या बाबतीत कोणाची ताकद जास्त : चीनची की भारताची

भारताने नुकताच आयएनएस कलवरी या पाणबुडीचं राष्ट्रार्पण केलं.

Updated: Dec 15, 2017, 10:14 PM IST
बघा पाणबुड्यांच्या बाबतीत कोणाची ताकद जास्त : चीनची की भारताची title=

नवी दिल्ली : भारताने नुकताच आयएनएस कलवरी या पाणबुडीचं राष्ट्रार्पण केलं.

शक्तिशाली नौदलं

या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांच्या नौदलातील पाणबुड्यांच्या ताकदीची तुलना करण्यात आली. दोघांचेही नौदल हे जगातील शक्तिशाली नौदलांपैकी आहेत. दोन्ही देशांना मोठे सागरी किनारे लाभले आहेत. 

बलाढ्य चीन

भारताकडे सध्या १५ तर चीनकडे  ६८ पाणबुड्या आहेत. चीन गेल्या कित्येक वर्षांपासून आपली सामरिक शक्ती वाढवतो आहे. चीनकडे असलेल्या  ताफ्यात अणुशक्तीवर चालणाऱ्या तसंच पारंपारिक पद्धतीच्या डिझेल-ईलेक्ट्रीक पद्धतीच्या पाणबुड्या आहेत. भारताकडेसुद्धा दोन्ही प्रकारच्या पाणबुड्या आहेत. 

आण्विक पाणबुड्यांची ताकद

चीनकडे भारतापेक्षा जास्त पाणबुड्या तर आहेतच पण त्यामध्ये गुणात्मक फरकसुद्धा आहे. भारताकडे फक्त एकच अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी आहे तर चीनकडे तब्बल १६ अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या आहेत. डिझेल-ईलेक्ट्रीक पद्धतीच्या पाणबुड्यांपेक्षा आण्विक पाणबुड्या या जास्त मारक क्षमतेच्या, कित्येक महिने पाण्याखाली राहू शकतात. यामुळे चीनची ताकद आणखीच वाढते.

ताकद वाढवण्याची गरज

अलीकडच्या काळात भारताने नौदलाची ताकद वाढवण्याकडे लक्ष द्यायला सुरूवात केली असली तरी चीनसमोर खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण आपली ताकद कित्येक पटींनी वाढवण्याची आवश्यकता आहे. कारण येणाऱ्या काळात हिंद महासागर हि भारत-चीन संघर्षातली नवी युद्दभूमी असू शकते.