Wuhan Lab : गेल्या दोन वर्षांपासून जगाला विखळ्यात अडकून ठेवणाऱ्या कोविडचा (Covid-19) पुन्हा उद्रेक होताना दिसतोय. चीनच्या (China) काही भागांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लॉकडाउन सदृश्य परस्थिती निर्माण झालीय. चीन सरकार लोकांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादत असल्याचे समोर आले आहे. मात्र कोरोनाची निर्मिती कुठून झाली याचा अद्याप शोध लागला नाहीये. मात्र चीनमध्ये पहिल्यांदा आढळून आलेला कोरोना विषाणूची (Corona Virus) उत्पती कुठे झाली याचे पुरावे अजूनही जगासमोर आलेले नाहीत. अमेरिकेसह अनेक देशांनी चीननेच या विषाणूची निर्मिती केली असे आरोप सातत्याने केले आहेत. मात्र चीनने हा दावा कायमच फेटाळून लावलाय. तर आता दुसरीकडे चीनच्या वुहान येथील लॅबमध्ये काम केलेल्या एका एका अमेरिकन शास्त्रज्ञाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
कोविड-19 हा मानवनिर्मित व्हायरस
चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच (Wuhan Laboratory China) हा विषाणू लीक झाला आणि त्याचा फैलाव झाला असा दावा अमेरिकेने केला होता. त्यानंतर आता या शास्त्रज्ञाने केलेल्या दाव्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. कोविड-19 हा मानवनिर्मित व्हायरस होता, जो प्रयोगशाळेतून लीक झाला होता, असा दावा या शास्त्रज्ञाने केला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञ अँड्र्यू हफ यांनी सांगितले की, 'कोरोना विषाणू दोन वर्षांपूर्वी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (WIB) मधून बाहेर पडला होता. चीन सरकार वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला संशोधनासाठी निधी देते.'
'The Truth About Wuhan' या पुस्तकात अँड्र्यू हफ यांनी चीनमधील कोरोना विषाणूच्या निर्मितीला अमेरिकेच्या सरकारने वित्तपुरवठा केल्यामुळे ही महामारी उद्भवली आहे. हफ यांच्या पुस्तकाचा काही भाग द सनने प्रकाशित केला होता.
व्हायरस बाहेर कसा पडला?
चीनने गेन ऑफ फंक्शन हा प्रयोग करताना योग्य काळजी घेतली गेली नाही. त्यामुळेच वुहान लॅबमधून व्हायरस लीक झाला. कोरोनाच्या सुरुवातीपासून वुहान लॅबमधूनच हा विषाणू बाहेर पडल्याचा दावा केला होता. त्यानंतर चीन सरकार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. "प्रयोगशाळांमध्ये योग्य सुरक्षा बाळगण्यासाठी पुरेशी यंत्रणा नव्हती. त्यामुळे वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये विषाणूची गळती झाली," असा दावा अँड्र्यू हफ यांनी केला.