मुंबई : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) आजाराच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी समोर आली आहे. वैज्ञानिकांनी एक थेरपी विकसित केली आहे, जी कोविड -19च्या ( COVID-19) 99.9 टक्के कणांचा नाश करण्यास सक्षम आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हा शोध परिणामकारक ठरु शकतो. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) क्वीन्सलँडच्या मेन्झीज हेल्थ इन्स्टिट्यूटच्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमने ही थेरपी विकसित केली आहे. ते म्हणतात की हे तंत्र क्षेपणास्त्रासारखे कार्य करते, जे प्रथम त्याचे टार्गेट शोधते आणि नंतर ते नष्ट करते.
'डेली मेल' च्या बातमीनुसार ही नेक्स्ट-जनरेशन टेक्नोलॉजी (Next-generation technology) आहे. 'heat-seeking missile' अर्थात हे क्षेपणास्त्र सारखे कार्य करते. हे प्रथम कोविड कण ओळखते आणि नंतर त्यांच्यावर हल्ला करते. या संशोधनात सहभागी झालेले प्रोफेसर निगेल मॅकमिलन (Nigel McMillan) म्हणाले की, या अभूतपूर्व उपचारातून व्हायरसची प्रतिकृती होण्यापासून रोखली जाऊ शकते आणि कोरोना विषाणूमुळे मृत्यू कमी होण्यास मदत होऊ शकते.
प्रोफेसर मॅकमिलन म्हणाले की, ही एक शोध आणि नष्ट करण्याचे अभियान आहे. या थेरपीच्या सहाय्याने आपण एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसात उपस्थित व्हायरस शोधून नष्ट करु शकतो. मॅकमिलनच्या म्हणण्यानुसार, थेरपी Gene-Silencing नावाच्या वैद्यकीय तंत्रावर आधारित आहे, जे पहिल्यांदा 1990 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सापडले होते. जीन-सिलिंग श्वसन रोगाचा (Respiratory Disease)हल्ला करण्यासाठी आरएनए वापरते. डीएनएसारखेच मूलत: शरीरात ब्लॉक्स बनवते.
प्राध्यापकांनी स्पष्ट केले की, हे एक तंत्र आहे जे आरएनएच्या लहान तुकड्यांसह कार्य करते. जे विषाणूच्या जीनोमशी (Genome) विशेषत: जोडले जाऊ शकते. हे बंधन Genomeला पुढे कार्य करण्यास देत नाही आणि शेवटी त्याचा नाश करते. तथापि, इतर अँटीव्हायरल उपचार अस्तित्त्वात आहेत, जसे झैनमवीर आणि रेमडेसिवीर. जी कोरोनाची लक्षणे कमी करते आणि रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत करते. परंतु ही उपचार थेट कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी कार्य करते.
निगेल मॅकमिलन म्हणाले की, औषध नॅनोपार्टिकल नावाच्या इंजेक्शनद्वारे रक्तप्रवाहात ओतले जाते. हे नॅनो पार्टिकल्स फुफ्फुसात प्रवेश करतात आणि पेशींमध्ये विलीन होतात. जे आरएनए वितरीत करतात. त्यानंतर आरएनए व्हायरस ओळखतो आणि त्याचे जीनोम नष्ट करतो, ज्यामुळे विषाणूची प्रतिकृती निर्माण होत नाही. ते म्हणाले की, वैज्ञानिक गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासून या उपचारांवर काम करत आहेत.