Coronavirus : "कोरोना अभी जिंदा है..."; आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक, गर्दीत मास्क घालण्याचा सल्ला

Corona Update :  चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रूग्णांसाठी रूग्णालयात जागा नाही.

Updated: Dec 21, 2022, 04:05 PM IST
Coronavirus : "कोरोना अभी जिंदा है..."; आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक, गर्दीत मास्क घालण्याचा सल्ला title=

corona virus: चीनमध्ये पुन्हा (Coronavirus in China) एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. कोविड-19 (Covid-19) निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रूग्णांसाठी रूग्णालयात जागा नाही. अंत्यविधीसाठीही तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. ही चिंताजनक परिस्थिती पाहता भारत सरकारलाही सतर्क करण्यात आले आहे. या संदर्भात बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.

चीन जपान अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर केंद्र सरकार (Central Government) अॅक्शन मोडवर (Action Mode) आलीय. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी आज एक हायव्होल्टेज मिटींग घेतलीय. या बैठकीनंतर केंद्र सरकारने अलर्ट नोटीस  (Alert Notice) जारी केलीय. याशिवाय देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना कोरोना अलर्ट नोटीस जारी करण्यात आलीय. या शिवाय देशात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती (Masks Mandatory) लागू होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. 

वाचा : कोरोनाची भीती आजही लोकांच्या मनात; महिलेने मुलीसोबत स्वतःला खोलीत कोंडलं, पतीसोबत केलेली वागणूक थक्क करणारी   

गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चीन, जापान, अमेरिकेत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणाही अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, देशावरील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही मांडविया म्हणाले. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत.

खबरदारीचा डोस घेण्याचे आवाहन

बैठकीनंतर, डॉ. व्हीके पॉल, सदस्य (आरोग्य), NITI आयोग म्हणाले की,  देशातील केवळ 27-28% लोकांनी प्रतिबंधात्मक डोस घेतले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सावधगिरीचे उपाय करण्याचे आवाहन करतो. सावधगिरीचा डोस अनिवार्य आहे आणि सर्वांसाठी निर्देशित आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करायला सांगितला आहे.