Coronavirus News : चीनमधल्या कोरोना (Coronavirus) रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर येतेय. चीनमध्ये फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. (Coronavirus outbreak in China) सरकारी आरोग्य विभागाची कागदपत्रं लीक झाल्याने हा आकडा समोर आलाय. (Coronavirus Updates) झीरो कोव्हिड पॉलिसी शिथील केल्यानंतर चीनमध्ये परिस्थिती भयावह बनत गेली. पुढच्या 3 महिन्यात 60 टक्के नागरिकांना कोरोना होणार असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येवरुन चीनने पुन्हा लपवाछपवी सुरु केली आहे. यापुढे चीनच्या आरोग्यविभागाला रुग्णसंख्या जाहीर करता येणार नाहीत, असा निर्णय चिनी सरकारने घेतला आहे. चीनच्या रुग्णसंख्येची माहिती ही रोग नियंत्रण केंद्र म्हणजेच सीडीसीकडून जाहीर केली जाईल असं सांगण्यात आले आहे. चीनच्या आरोग्य विभागाचा एक अहवाल लीक झाला होता. ज्यात एका दिवसात चीनमध्ये 3 कोटी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर चीनी सरकारने हा निर्णय घेतला.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या बैठकीत कोरोनासंदर्भातली आकडेवारी ठेवण्यात आली होती. 20 मिनिटं चाललेल्या या बैठकीतली कागदपत्रं लीक झालीत. लोकांपर्यंत सत्य समोर येण्यासाठी कोण्या अधिका-याने ही माहिती लीक केल्याचा आरोप आहे. एका ब्रिटीश दाव्यानुसार चीनमध्ये रोज 5 हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय, तर दरदिवशी 10 लाखांहून अधिक लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत.
जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे. जपानमध्ये काल दिवसभरात कोरोनानं 371 जणांचा बळी घेतला. तर चीनमध्ये दिवसाला पाच हजार लोकांचा मृत्यू होत असल्याची बाब पुढे आलेय. तर रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारतातही आता काळजी घेण्यात येत आहे. सरकारने खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच परदेशातून भारतात येणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
चीनमधून उद्भवलेल्या कोरोना विषाणूचा जगभरातील देशांमध्ये प्रकोप दिसून येत आहे. अलीकडेच, कोरोना BF.7 च्या नवीन व्हेरिएंडने सर्वांची चिंता वाढवली आहे. या नवीन व्हेरिएंडची अनेक प्रकरणे भारतातही दिसली आहेत. एकीकडे जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे आणि त्याच दरम्यान आणखी एक आजार वेगाने पसरत आहे. त्याच्या कहरामुळे डॉक्टरही घाबरले आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर आजकाल ब्रिटनचे डॉक्टर कोरोनाशिवाय आणखी एका आजाराचा सामना करत आहेत. हा एक प्रकारचा धोकादायक ताप असून तो रुग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे.
कोरोनाचा उद्रेक झाल्याने चीनमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. (Coronavirus) रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यामुळे मोठा ताण पडला आहे. औषधांच्या तुटवड्यासह डॉक्टर्स आणि नर्स यांचाही तुटवडा जाणवत आहे. चीनच्या लोकांना तापावरच्या गोळ्याही मिळत नसल्याने रुग्ण आणि नागरिक हैराण झालेत.
औषधांच्या कमतरतेमुळे तापाच्या गोळ्यांसाठी आयकार्ड बंधनकारक करण्यात आलं असून, आठवड्यासाठी फक्त 6 गोळ्याच खरेदी करता येणार आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी औषधांच्या आणि टेस्ट किट निर्माण करणाऱ्या कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. टेस्ट किटचं उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.