जगातला सर्वांत Longest Underwater Kiss!गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद,पाहा VIDEO

Longest Underwater Kiss Guinness World Records :कॅनडाच्या माइल्स क्लाउटियर आणि दक्षिण आफ्रिकेच्या बेथ नीले यांनी लॉगेस्ट अंडरवॉटर किस्स (Longest Underwater Kiss) केला आहे. या कपलने पाण्याखाली 4 मिनिटे 6 सेकंद सलग किस्स केला आहे. वेलेंटाईन (valentines day)निमित्त त्यांनी हा किस्स केला होता. 

Updated: Feb 15, 2023, 04:58 PM IST
 जगातला सर्वांत Longest Underwater Kiss!गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद,पाहा VIDEO title=

Longest Underwater Kiss Guinness World Records : बॉलिवूडमध्ये नुसतं किस्स जरी म्हटलं तरी चाहत्यांना अभिनेता इम्रान हाश्नीची (Imran Hashmi) आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण त्याने बॉलिवूड सिनेमांमध्ये दिलेले किस्स सीन नेहमीच गाजले आहेत. मात्र आता इम्रान हाश्मीपेक्षाही भन्नाट किस्स करणारी एक जोडी समोर आली आहे. या जोडीने जगातला सर्वांत लॉंगेस्ट अंडरवॉटर किस्स (Longest Underwater Kiss) केला आहे. त्यांच्या या लॉंगेस्ट किस्सची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंद झाली आहे. नेमका हा अंडरवॉटर किस्स कसा करण्यात आला आहे. आणि या किस्सची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद कशी झाली आहे. हे जाणून घेऊयात.

रेकॉर्ड काय?

कॅनडाच्या माइल्स क्लाउटियर आणि दक्षिण आफ्रिकेच्या बेथ नीले यांनी लॉगेस्ट अंडरवॉटर किस्स (Longest Underwater Kiss) केला आहे. या कपलने पाण्याखाली 4 मिनिटे 6 सेकंद सलग किस्स केला आहे. वेलेंटाईन (valentines day)निमित्त त्यांनी हा किस्स केला होता. या लॉगेस्ट अंडरवॉटर किस्सचा आता वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.कारण गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने या लॉगेस्ट अंडरवॉटर किस्सची दखल घेतली आहे.या किस्सची आता सोशल मीडियावर चर्चा आहे.  

कुठे घेतला KISS?

माइल्स क्लाउटियर आणि बेथ नीले यांनी मालदीवमधील आलिशान साउथ एरी अॅटोल रिसॉर्टमध्ये हा विक्रम केला आहे. कपलने रिसॉर्टमधील इन्फिनिटी पूल निवडला. पुलच्या पाण्यात त्यांनी सलग 4 मिनिटे 6 सेकंद पाण्याखाली किस्स केले.  त्यामुळे हा जगातला सर्वांत लॉगेस्ट अंडरवॉटर किस्स (Longest Underwater Kiss) ठरला आहे. तसेय या किस्सची गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्येही (Guinness World Records)नोंद करण्यात आली आहे. दरम्यान याआधी एका क्षणात 3 मिनिटे 24 सेकंद किस्स घेतले होते. एका इटालियन टीव्ही शोदरम्यान हा विक्रम करण्यात आला होता.

हे किस्स शक्य होईल अशी अपेक्षा नव्हती. 3 मिनिटांचे टार्गेटही पार करणे खूप अवघड वाटत होते. फक्त व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा विक्रम आपोआप 4 मिनिटांच्या पार गेला, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी बोलताना नील आणि क्लाउटियर म्हणाले आहेत. 

मालदीवच्या टॉप व्हिडिओग्राफरंपैकी एक असलेल्या साईड द शार्कने कपलचे हे अंडरवॉटर किस्स रेकॉर्ड (Longest Underwater Kiss) केले आहे.हा किस्स करून त्यांनी अनोखा रेकॉर्ड केला आहे. तसेच हे किस्स पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी जमली होती. तसेच हा किस्स पाहून अनेकांना इम्रान हाश्मीचा रेकॉर्ड ब्रेक झाल्याचे वाटत आहे.