Chair of Death : विज्ञानाने आज भलेही खूप प्रगती केली असली तरीही जगात अशी काही रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा अजून झालेला नाही. गेल्या अनेक काळापासून ही रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला, मात्र बरेचण जण अपयशी ठरले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या रहस्यावरून अजून पडदा उठू शकला नाहीये.
इंग्लंडच्या नॉर्थ यॉर्कशायरमध्ये एक खुर्ची आहे, जिला शापित मानलं जातं. ही खुर्ची थॉमस बस्बी नावाच्या व्यक्तीची आहे. हा व्यक्ती फार क्रूर होता. त्याला 1802 मध्ये त्याचे सासरे डॅनियल यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. थॉमस बस्बीने त्याच्या सासऱ्याची हत्या गळा घोटून केली होती. हत्येमागचं कारण म्हणजे ते त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसले होते.
मृत्यूपूर्वी बस्बीची शेवटची इच्छा विचारली गेली तेव्हा तो म्हणाला, जो पण या खुर्चीवर बसेल त्याचा मृत्यू होईल. असं म्हटलं जातं की, आतापर्यंत जवळपास 63 लोकांचा मृत्यू या खुर्चीवर बसल्यामुळे झाला आहे. ही खुर्ची तिरस्क नावाच्या म्यूझियमध्ये ठेवण्यात आली आहे.
1950 मध्ये गिओवन्नी ब्रेगोलिन यांनी एक चित्र काढलं होतं. या पेंटींगला शापित मानलं जातं. जो व्यक्ती हे पेंटींग घरी लावतो, त्याच्या घरी आग लागते. मुख्य म्हणजे, ज्यावेळी घराला आग लागते, तेव्हा घरातील सर्व वस्तू जळून खाक होतात. मात्र या पेंटींगचा काहीही होत नाही.
‘द सन’ या वृत्तपत्राने 5 सप्टेंबर 1985 मध्ये दिलेल्या एका रिपोर्टनुसार, जेव्हा आग विझवण्यासाठी अधिकारी घरी जातात, त्या घरामध्ये या रडणाऱ्या मुलाचं चित्र असतं. अशा घटनांनंतर अनेकांनी घरी हे पेंटींग ठेवणं बंद केलं.