पृथ्वीवरील सर्वात सुंदर नदीची पदवी कोणत्या नदीला मिळाली? रंग बदलणारी ही नदी कुठे आहे?

नदीच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रत्येक हंगामात ती नदी तिचा रंग बदलते.

Updated: Aug 6, 2021, 02:14 PM IST
पृथ्वीवरील सर्वात सुंदर नदीची पदवी कोणत्या नदीला मिळाली? रंग बदलणारी ही नदी कुठे आहे? title=

मुंबई : निसर्गाचे रुप हे अप्रतिम असते. ते नेहमाच सगळ्यांना त्याच्या सौंदर्याने आश्चर्यचकीत करत असते. लोकांना निसर्गाचे असे दृष्य पाहायला आवडते तर, अनेक निसर्गरप्रेमी निसर्गाच्या सानिध्यात आले की, सगळं विसरुन जातात. तुम्हाला माहित आहे का की, रंग बदलणारी नदी देखील या जगात आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटले, पण हे खरे आहे. या नदीचे नाव कॅनो क्रिस्टल्स आहे, ही नदी कोलंबियात वाहते.

त्याच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रत्येक हंगामात ती नदी तिचा रंग बदलते. ज्यामुळे तिला रिवर ऑफ 5 कलर्स (River of Five Colors)  किंवा लिक्विड रेंबो (Liquid Rainbow) असेही म्हणतात.

कॅनो क्रिस्टल्स कोलोम्बियातील सेरेनिया डी ला मॅकेरेना राष्ट्रीय उद्यानात वाहते. ही नदी 100 किमी पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेली आहे. वर्षातील सहा महिने ती लहान नदीसारखी दिसते, परंतु जून ते नोव्हेंबरपर्यंत नदीचा रंग कधी पिवळा, कधी निळा, कधी हिरवा, कधी लाल आणि कधी काळा असतो.

या नदीला पृथ्वीवरील सर्वात सुंदर नदीची पदवी मिळाली आहे. खरं तर, जून ते नोव्हेंबर पर्यंत, कॅनो क्रिस्टल्समध्ये पोडोस्टेमॅसी, किंवा मॅकेरेना क्लेविगेरा, वनस्पती असताता जे पाण्याचा तळाला येतात. म्हणूनच नदी या झाडांचे रंग दिसतात.

नदीचे पाणी अगदी स्वच्छ आहे. त्यामुळे या पाण्यात असलेले मॅकेरेनिया क्लेविगेरा वनस्पती पाण्यात दिसते. ही वनस्पती नदीचे उन्हापासून आणि पोषक तत्वांपासून संरक्षण करते. त्याच वेळी, ते पाण्यातन चमकते देखील ज्याला पाहायला नागरीक गर्दी करतात.

या नदीपासून सुमारे 30 किमी अंतरावर कोलंबियन सैन्याचा हक्क आहे. हे ठिकाण आता प्रसिद्ध पिकनिक स्पॉट बनले आहे. कॅनो क्रिस्टल काही वर्षांपासून लोकांसाठी बंद होती. या नदीचा काही भाग कोलंबियन निमलष्करी दल आणि गनिमी कावां करणाऱ्या लोकांनी 1989 ते 2009 दरम्यान नष्ट केला. त्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टीने येथे एका दिवसात फक्त 200 पर्यटकांना येथे जाण्याची परवानगी आहे.

कोलंबियातील 'सेरानिया डे ला' मॅकेरेना राष्ट्रीय उद्यान एक संरक्षित क्षेत्र आहे. येथे अ‍ॅमेझॉन रेन फॉरेस्ट, अँडीज रेंज आणि ईस्टर्न लानलोस हे हिरव्या सवानाहच्या मैदानामध्ये समाविष्ट आहेत. जगातील विलक्षण वनस्पती आणि प्राणी या ठिकाणी आढळतात. उद्यानात 2 हजार प्रकारचे झाडं आढळतात. पक्ष्यांच्या 500 प्रजाती, 1 हजार 200 प्रकारचे कीटक, 100 प्रकारचे सरपटणारे प्राणी, 50 उद्याने, माकडांच्या आठ प्रजाती आणि इतर अनेक प्राणी आहेत जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.