अमेरिका : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची चर्चा सध्या रंगलीये.
एका पुस्तकामध्ये ट्रम्प यांचे सहकारीच त्यांच्या मानसिक स्थैर्याबद्दल साशंक असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे त्यांच्यावर मानसोपचार केले जातायत का, अशी शंका उपस्थित झालीये. मात्र व्हाईट हाऊसचे आरोग्य अधिकारी असलेले नौदलाचे रिअर अॅडमिरल डॉ. रोनी जॅक्सन यांनी हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलंय.
आपण स्वतः ट्रम्प यांची चाचणी घेतलीये. त्यांना या चाचणीत 30 पैकी 30 गुण मिळालेत. त्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य बिघडलं असण्याची कोणतीही शक्यता नाही, असं डॉ. जॅक्सन यांनी स्पष्ट केलंय.
मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, एका वेगळ्या वादात अडकले आहेत. ट्रम्प यांचे पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याची बाब आता समोर आली आहे.अमेरिकन वृत्तपत्र 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने हे वृत्त प्रकाशित केलं आहे. मात्र आपले या पॉर्न स्टार सोबत संबंध आले नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
हे अमेरिकेच्या जनतेसमोर येऊ नये, यासाठी पॉर्न स्टारला लाखो रुपये देण्यात आले, अशी बातमी झळकल्यानंतर, डोनाल़् ट्रम्प वादात आले आहेत.
याची वाच्यता माध्यमांमध्ये किंवा कुठेही करू नये म्हणून, क्लिफोर्डला सुमारे 82.69 लाख रुपये देण्यात आले होते. खरंतर अध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अनेक महिलांनी असे आरोप केले आहेत. आता पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याच्या वृत्ताने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.