डोनाल्ड ट्रम्प यांची लहान मुलगी टिफनी ट्रम्पने केली आपल्या एंगेजमेंटची घोषणा

27 वर्षाची टिफनी ट्रम्प ही डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची दुसरी पत्नी मार्ला मेपल्स यांची मुलगी आहे.

Updated: Jan 20, 2021, 07:39 PM IST
डोनाल्ड ट्रम्प यांची लहान मुलगी टिफनी ट्रम्पने केली आपल्या एंगेजमेंटची घोषणा

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांची लहान मुलगी टिफनी ट्रम्प यांनी आपल्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे. टिफनीने मंगळवारी व्हाईट हाउसमध्ये आपले वडील डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचा दिवस असताना एंगेजमेंट केल्याची घोषणा केली. तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. मायकल बुलोससोबत फोटो शेअर टिफनी ट्रम्पने म्हटलं की,, 'व्हाईट हाऊसमध्ये अनेक ऐतिहासिक क्षण साजरे केले. आपल्या कुटुंबासोबत इथे राहणं एक सन्मान होता. पण मायकल सोबत एंगेजमेंटपेक्षा अधिक इतर काही खास नव्हतं.'

टिफनीने म्हटलं की, ती आता आयुष्यातील नव्या चॅप्टरची वाट पाहत आहे. 27 वर्षाची टिफनी ट्रम्प ही डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची दुसरी पत्नी मार्ला मेपल्स यांची मुलगी आहे. जॉर्ज टाउन विद्यापीठाच्या लॉ स्कूलमधून तिने कायद्याचे शिक्षण घेतलं आहे. मायकल बुलोसचं वय 23 वर्ष आहे. तो एका नायजेरियन उद्योगपतीचा मुलगा आहे.

लंडनमध्ये मायकल आणि टिफनी यांची भेट झाली होती. ट्रम्प यांना 5 मुलं आहेत. ट्रम्प यांना मेलानिया ट्रम्प यांच्याकडून १४ वर्षांचा मुलगा बैरन आहे. इवाना ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांना जूनियर ट्रम्प (43), इवांका (39) आणि एरिक ( 37) अशी ३ मुले आहेत.