Layoff : Twitter मधून सफाई कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, आता 'हे' करणार साफसफाई

Job News : आता बातमी ट्विटरमधून... एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली.

Updated: Dec 11, 2022, 10:42 AM IST
Layoff : Twitter मधून सफाई कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, आता 'हे' करणार साफसफाई title=
Elon Musk Aide Told Fired Twitter Cleaners They Would Be Replaced By Robots nmp

Twitter News Elon Musk : एलॉन मस्क यांनी ट्विटरची (Twitter ) सूत्र हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली असून अद्यापही हे थांबलेलं नाही. यावेळी ट्विटरमधून सर्व सफाई कर्मचाऱ्यांनाही (Cleaners) काढण्यात आलंय. तात्काळ प्रभावाने या सफाई कर्मचाऱ्यांना ट्विटरमधून हटवण्यात आलं. सफाई कर्मचाऱ्यांची जागा आता रोबोट (Robots) घेणार आहेत. (Elon Musk Aide Told Fired Twitter Cleaners They Would Be Replaced By Robots)

सफाई कर्मचाऱ्यांच्या युनियनला याबाबत मागच्याच आठवड्यात इशारा देण्यात आला होता. याविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले होते. पण मस्क यांनी सफाई कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस किंवा पगार न देता तात्काळ काढून टाकलंय. त्यामुळे मस्क यांनी कायदा मोडला का याचीही पडताळणी सुरु असल्याचं समजतंय.

या प्रकरणाची पडताळणी सॅन फ्रांसिस्कोचे वकील डेविल चिउ हे करण्यार आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार कायद्यांचे उल्लंघन करण्याचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे या नोकरी कपातीमुळे मला आश्चर्य वाटलं नसल्याचं चिउ यांनी सांगितलं आहे. नोकरीवरुन काढून टाकण्यात आलेल्या कामगाऱ्यांचा हितासाठी मी पूर्णपणे मदत करेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

यापूर्वी  काही दिवसांपूर्वी ओयोने 600 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं. यापूर्वी फेसबुक (Facebook), मेटा (Meta)आणि अॅमेझॉन (Amazon) या नावाजलेल्या कंपन्यांनी अचानक कर्मचाऱ्यांचा नोकरीवर गदा आणली. नोकरी कपातीचं संकट अजूनही कर्मचाऱ्यांवर घोंगावतंय. अशातच अजून एका लोकप्रिय कंपनीने नोकर कपातीचा (Staff reduction) निर्णय घेतला आहे. पेप्सिको कंपनीही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार 100 अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी (Cost Cutting) जाण्याची शक्यता आहे.