मुंबई : टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी ट्विटरमध्ये 9.2% हिस्सा विकत घेतला आहे. ही माहिती जगभर प्रसिद्ध झाल्यानंतर प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये ट्विटरचे शेअर्स 28 टक्क्यांपर्यंत वाढले.
नियामक फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एलोन मस्कने सोशल मीडिया कंपनीमध्ये 9.2% पॅसिव भागीदारी खरेदी घेतली आहे. इलॉन मस्क यांनी सुरुवातीपासूनच ट्विटरच्या धोरणांवर टीका केली आहे. याबाबत ते रोज ट्विट करीत असतात. मस्क हे ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, मस्कने ट्विटरमधील स्टेक विकत घेतल्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये ट्विटरचे शेअर्स 28.49% वाढून $50.51 वर गेले. नुकतेच मस्कने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा गंभीरपणे विचार करत आहोत कारण ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वाच्या बाबतीत अपयशी ठरले आहे.
#BREAKING | Elon Musk buys 9% stake in Twitter, stock jumps 25% pic.twitter.com/mGguYrwKGj
— WION (@WIONews) April 4, 2022
मस्क यांनी ट्विटरवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 25 मार्च रोजी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी 'लोकशाहीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे' असे म्हटले होते. ट्विटर या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करते का, असा सवाल त्यांनी ट्विटरवर केला होता.