मुंबई : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कने (Elon Musk twitter deal) ट्विटर खरेदी केले आहे. या ट्विटर खरेदीनंतर एलॉन मस्कने अनेक मोठे निर्णय़ घेतले आहेत. या त्याच्या निर्णयामुळे तो खुप चर्चेत आला आहे. मात्र आज सकाळी त्याने भोजपूरीतून ट्विट करून भारतीयांनाच शॉक दिला. जगातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती भोजपूरीतून ट्विट करतोय हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.मात्र एलॉन मस्क (Elon Musk) भोजपूरीतून ट्विट का करतो आहे? हे जाणून घेऊयात.
एलॉन मक्सने (Elon Musk twitter deal) ट्विटरची डिल केल्यापासून तो अनेकांच्या निषाण्यावर आला आहे. अनेक लोक त्याला ट्रोल करत आहेत, काहींनी तर ट्विटर देखील सोडून टाकलं. त्यात एका ट्विटर य़ुझरने एलॉन मक्सचे अकाऊंट क्लोन केलं होते. त्याचे अकाऊंट हूबेहूब मस्क सारखे होते.प्रोफाइल फोटोपासून कव्हर फोटो, बायो आणि नाव एकसाऱखचं होते. त्यामुळे अनेकांना एलॉन मस्कच भोजपूरीतून ट्विट करत असल्याचे दिसत होते. मात्र Twitter मध्ये हे वैशिष्ट्य आहे की तुम्ही नावापासून बायोमध्ये बदलू शकता, जरी हँडल तेच राहते जे कधीही बदलू शकत नाही.
ऑस्ट्रेलियाचे हिंदीचे प्राध्यापक इयान वूलफोर्ड हे ऑस्ट्रेलियातील एका महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक आहेत. ट्विटरवरील त्यांचे खाते @iawoolford या हँडलवरून आहे. या अकाऊंटवर त्यांनी इलॉन मस्क सारखचं बायो आणि फोटो टाकत अनेक य़ुझर्सची फसवणूक केली होती. यानंतर आता @iawoolford या हँडलचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. दरम्यान हे टविट सस्पेंड होण्यापुर्वी त्याचे 97.2K फॉलोअर्स होते.
एलॉन मस्कने (Elon Musk) ब्लू टिकसाठी $8 आकारण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून गोंधळ सुरू झाला आहे. याशिवाय त्याने ट्विटरच्या जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. भारतातील संपूर्ण ट्विटर टीमला कामावरून काढून टाकण्यात आल्याचा दावा केला जात आहे.