इथिओपियन एअर लाइन्सचे विमान कोसळले, १५७ प्रवासी मृत्यूमुखी

अपघातात एकही प्रवासी वाचला नसल्याचे समोर येत आहे.

Updated: Mar 10, 2019, 05:58 PM IST
इथिओपियन एअर लाइन्सचे विमान कोसळले, १५७ प्रवासी मृत्यूमुखी title=

एडिस अबाबा जवळ इथिओपियन एअर लाइन्सचे विमान कोसळल्याची घटना समोर येत आहे. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. विमानात १४९ प्रवासी आणि ८ क्रू मेंबर्स प्रवास करत होते. या अपघाता दुर्दैवी सर्वांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. अपघातात एकही प्रवासी वाचला नसल्याचे समोर येत आहे.

इथिओपियन एअर लाइन्सचे बोईंग 737 हे विमान  केन्याची राजधानी असलेल्या नैरोबी येथे सकाळी ८.३८ वाजता उड्डान भरले होते. अंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डान भरताच विमानाचे कंट्रोल रूमशी संपर्क तुटल्याने अपघात झाला.

एअर लाइन्सने सांगीतले, 'इथिओपियन एअर लाइन्सचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून. महत्वपूर्ण सेवा देणे सुरू केले आहे. त्याचप्रमाणे अपघातातील मृत व्यक्तिची ओळख पटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.