मृत्यूनंतरही महिला देऊ शकते बाळाला जन्म, कसं? जाणून घ्या!

मृत्यूनंतर व्यक्तीचं काय होतं? तो कुठे जातो? याबाबत आतापर्यंत अनेकवेळा संशोधन करण्यात आलं आहे.

Updated: Jun 26, 2022, 12:43 PM IST
मृत्यूनंतरही महिला देऊ शकते बाळाला जन्म, कसं? जाणून घ्या! title=

मुंबई : जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा, श्वास पूर्णपणे थांबतो आणि संपूर्ण आयुष्य थांबतं. मृत्यूनंतर व्यक्तीचं काय होतं? तो कुठे जातो? याबाबत आतापर्यंत अनेकवेळा संशोधन करण्यात आलं आहे. अशातच काही लोकांनी मृत्यूच्या दाढेतून परतल्याचा दावाही केला आहे. मात्र हे केवळ दावेच राहिले. 

जिवंत लोकांना मृत्यूनंतर काय होतं हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. मृत्यूनंतर जीवन आहे की नाही? मानवी आत्मा कुठे जातो? त्याचे काय होतं? असे अनेक प्रश्न मनात येतात. पण या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही नीट मिळालेली नाहीत. आज आम्ही तुम्हाला मृतदेहाशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. ज्या जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

  • जर प्रसूतीच्या वेळी गर्भवती महिलेचा मृत्यू झाला तरीही तिच्या मृत शरीरातून बाळाला जन्म मिळू शकतो. याला विज्ञानाच्या भाषेत कॉफिन बर्थ म्हणतात. महिलेच्या मृत्यूनंतर, तिच्या शरीरात एक वायू तयार होतो जो, पोटातून बाळाला बाहेर ढकलतो. अशा प्रकारे मृत शरीर मुलाला जन्म देतं.
  • एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं शरीर झाकलं गेलं नाही तर त्याची त्वचा चामड्याप्रमाणे कडक होते.
  • जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा शरीरात अनेक प्रकारचे वायू तयार होतात. हे वायू शरीराच्या आतड्यामध्ये तयार होतात. यासोबतच शरीरातील अवयवही सडू लागतात. यावेळी डोळ्यांचा आकार बदलण्याची शक्यता असते. तसंच जीभेला सूज आल्याने ती तोंडातून बाहेर पडू शकते.
  • मृत्यूनंतर अनेक वेळा शरीरातून आवाज येतो. वास्तविक, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा शरीरातील बॅक्टेरिया गॅस बनवू लागतात. त्यामुळे स्वराच्या स्नायूंवर दबाव येतो आणि शरीरातून आवाज येऊ शकतो लागते.