स्विमिंग पूलमध्ये अडकली महिला, Facebook मुळे वाचला जीव

स्विमिंग पूलमध्ये अडकलेल्या ६१ वर्षीय महिलेचा जीव फेसबुकमुळे बचावला आहे. होय, आश्चर्य वाटतयं ना? पण असं खरोखर घडलं आहे. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 20, 2017, 08:44 PM IST
स्विमिंग पूलमध्ये अडकली महिला, Facebook मुळे वाचला जीव  title=
Representative Image

न्यूयॉर्क : स्विमिंग पूलमध्ये अडकलेल्या ६१ वर्षीय महिलेचा जीव फेसबुकमुळे बचावला आहे. होय, आश्चर्य वाटतयं ना? पण असं खरोखर घडलं आहे. 

न्यूयॉर्क डेली ने दिलेल्या वृत्तानुसार, ६१ वर्षीय एक महिला स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरली. मात्र, बाहेर येत असताना स्विमिंग पूलची शिडीच तुटली आणि त्यामुळे ही महिला आतच अडकली. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी या महिलेला इतरही रस्ता नव्हता. 

अनेक प्रयत्न केल्यानंतरही या महिलेला स्विमिंग पूलमधून बाहेर पडता येत नव्हतं. त्यानंतर तिने मोठ्या प्रयत्नांनी स्विमिंग पूल शेजारी असलेली खुर्ची खेचली. त्या ठिकाणी या महिलेचा आयपॅड होता.

यानंतर तिने आयपॅडच्या मदतीने फेसबुकवर अॅपिंग स्वॉक्स ग्रुप पेजवर एक मेसेज पाठविला. सर्वांच लक्ष आपल्याकडे केंद्रीत व्हावं म्हणून तिने फेसबुकवर ९११ असा मेसेज लिहीला. यानंतर हा मेसेज युजर्सने पाहिला आणि ते तिच्या मदतीला धावले. फेसबुक युजर्सने तेथे पोहचून त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढले.