शेअर बाजारात फेसबुकच्या शेअर्सची मोठी आपटी

दुसऱ्या तिमाहीचा अहवाल आल्यानंतर फेसबुकला अपेक्षेएवढी वाढ साधता आलेली नसल्य़ाचे समोर आले.

Updated: Jul 26, 2018, 10:43 PM IST
शेअर बाजारात फेसबुकच्या शेअर्सची मोठी आपटी title=

मुंबई: आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात गुरुवारी फेसबुकच्या शेअर्सने मोठी आपटी खाल्ली. फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गलाही याची मोठी झळ बसली आहे. अवघ्या दोन तासांत फेसबुकच्या शेअरचा भाव 20 टक्क्यांनी कोसळला आणि मार्क झकरबर्गची संपत्ती तब्बल 16.8 अब्ज डॉलर्सनी घटली. 

आता मार्क झकरबर्गच्या ताब्यात असलेल्या शेअर्सचे बाजारमूल्य सुमारे 70 अब्ज डॉलर्स आहे. जे बुधवारी सकाळी 84 अब्ज डॉलर्सच्या आसपास होते. ही रक्कम मार्क झकरबर्गच्या एकूण संपत्तीच्या एक पंचमांश इतकी आहे. 

दुसऱ्या तिमाहीचा अहवाल आल्यानंतर फेसबुकला अपेक्षेएवढी वाढ साधता आलेली नसल्य़ाचे समोर आले. माहितीसंदर्भात विविध देशांमध्ये बदलत असलेले कायदे, श्रीलंका व म्यानमारमध्ये चुकीची माहिती पसरवली गेली. त्यामुळे झालेल्या दंगली, घटणारे किंवा अपेक्षेइतके न वाढणारे युजर्स हे सर्व फेसबुकच्या शेअर्सच्या घसरणीसाठी कारणीभूत आहेत.