Fact Check | बापरे! घराबाहेर 10 फूट लांब मगर, पुढे काय घडलं? पाहा

जर समजा, तुमच्या घराबाहेर भलीमोठी मगर आली तर? पाहा व्हायरल व्हीडिओ

Updated: Apr 22, 2022, 11:34 PM IST
Fact Check | बापरे! घराबाहेर 10 फूट लांब मगर, पुढे काय घडलं? पाहा title=

मुंबई : आपल्या नकळत एखाद्या व्यक्तीने पाठीवर हात मारला तरी आपण थबकतो. काही क्षणासाठी आपली भंबेरी उडते. जर समजा, तुमच्या घराबाहेर भलीमोठी मगर आली तर? तुम्ही पण घाबरलाच. अशीच एक महाकाय 10 फूटांची मगर घराबाहेर आली आणि सर्वांची एकच तारांबळ उडाली.  हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (fact check 10 foot long crocodile found out of house know what truth)

अचानक घराबाहेर 10 फूट लांब मगर पाहून सगळेच घरात लपून बसले. या सर्व प्रकारानंतर तिथल्या लोकांनी रेस्क्यू टीमला फोन केला. पण, त्यांनी फोन उचललाच नाही. अखेर ही मगर काही वेळ थांबल्यानंतर पाण्यात निघून गेली. त्यानंतर घरात लपून बसलेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र हा व्हीडिओ कुठला आहे याबाबत अजून काही स्पष्ट नाही.