Fact Check : कार चालवताना तुम्ही संमोहित व्हाल?

गाडी चालवताना चालकांना संमोहित केलं जात असल्याचा दावा केला जात आहे.

Updated: Jun 16, 2022, 11:00 PM IST
Fact Check : कार चालवताना तुम्ही संमोहित व्हाल? title=

मुंबई : गाडी चालवताना चालकांना संमोहित केलं जात असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल होत आहे. आम्ही या व्हारल होणाऱ्या मेसेजबाबत  तथ्य पडताळून पाहिलं. हा दावा खरा आहे की खोटा हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. (fact check viral polkhol car driver hipnoties know what truth what false)

दावा आहे की तुम्ही कार चालवत असाल तर वेळीच सावध व्हा...कारण, तुम्हाला कुणीतरी कार चालवताना संमोहित करेल. याला हायवे हिपनोसिस असं म्हणतात. यामुळे तुम्हाला कुठे जायचंय हे विसरून जालच. त्यापेक्षा भयंकर म्हणजे अपघाताची शक्यता असते असा दावा करण्यात आलाय. पण, नक्की कार चालवताना संमोहित कोण करतं ? या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. आमचे प्रतिनिधी अरुण मेहेत्रे हे तज्ज्ञांना भेटले...आणि त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा..

व्हायरल पोलखोल

हायवे हिपनोसिसमध्ये तथ्य आहे. मेंदूच्या क्षमतेशी संबंधित हा विषय आहे. गाडी चालवताना नजर समोर असल्यानं संमोहन होऊ शकतं. अशा वेळी थोडावेळ थांबावं,सलग ड्रायव्हिंग टाळावी. गाडीत गाणी लावावीत किंवा शेजा-याशी गप्पा माराव्या. हायवे हिप्नोसिसमुळे अपघाताची शक्यता नाही. 

गाडी चालवताना एकटक नजर समोर असल्याने हिप्नोसिसची शक्यता आहे...पण, हायवे हिप्नोसिस अपघात होतो हा दावा आमच्या पडताळणी असत्य ठरला.