आईस्क्रीमच्या दुकानात 90 मिनिटं असं काही घडलं की बनला World Record

आईस्क्रीमच्या दुकानात 90 मिनिटामध्ये जे घडलं त्याने झाला World Record

Updated: Sep 21, 2022, 12:00 AM IST
आईस्क्रीमच्या दुकानात 90 मिनिटं असं काही घडलं की बनला World Record title=

Ice Cream Shop world record : आईस्क्रीमची अनेक दुकाने आपण पाहिली असतील. मात्र अमेरिकेतील (US) एका आईस्क्रीमच्या दुकानामध्ये असं काही घडलं की त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याआधी अनेक विक्रम आपण पाहिले असतील ज्याची गिनीजमध्ये नोंद झाली. मात्र आईस्क्रीमच्या दुकानामध्ये असं काय घडलं की ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. (Ice Cream Shop World Record)

अमेरिकेमधील एका दुकानामध्ये 90 मिनिटांमध्ये तब्बल 266 वेगवेगळे मिल्कशेक सर्व केले आहेत. या दुकानाचं नाव 'स्नो कॅप' (Snow Cap Ice Cream Shop) असं आहे. या आईस्क्रीम पार्लरमध्ये लोक दुरवरून येतात. अमेरिकेमधील ॲरिझोना (Arizona) इथं हे पार्लर असून दोन कुटुंब मिळून ते चालवतात. 

स्नो कॅपमध्ये मिल्कशेकसोबत अनेक फ्लेवर्स ट्राय केले आहेत. मिल्कशेकमध्ये बर्गर, पिझ्झा यांसारख्या अनेक स्नॅक्सचा वापर केला गेला आहे. एखाद्या राज्यातील लोकप्रिय फूड डेस्टिनेशनवर जेव्हा काहीतरी नवीन घडत असेल तेव्हा तिथे प्रचंड गर्दी व्हायला होते हे काही नवीन नाही.

मिल्कशेक वेगवेळ्या फ्लेवर्ससह देताना स्नो कॅपने जवळपास 266 वेगवेगळे मिल्कशेक तेही 90 मिनिटांमध्ये  बनवण्याचं काम केलं. मिल्क शेकच्या प्रयोगादरम्यान गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची टीमही उपस्थित होती.