महिला शिक्षिकेला छोटीशी चूक पडली महागात, या गोष्टीमुळे शाळेनं नोकरीवरून काढलं

स्टारबेसने साराला तत्काळ कामावरून काढून टाकले आहे. परंतु यानंतर साराला आपल्या सोशल मीडियाच्या कमाईवरुन घर चालवावे लागले आहे.

Updated: Jul 7, 2022, 09:57 PM IST
महिला शिक्षिकेला छोटीशी चूक पडली महागात, या गोष्टीमुळे शाळेनं नोकरीवरून काढलं title=

मुंबई : समाजात शिक्षकांचा खूप मान आणि आदार केला जातो. कारण याच शिक्षकांच्या अंगावर विद्यार्थ्यांचं भविष्य असतं. हेच शिक्षक मुलांना घडवतात. परंतु अमेरिकेतील एका महिला शिक्षिकेने असे काही केले की, तिला नोकरी गमवावी लागली. या शिक्षिकेने स्वतःसह शाळेची प्रतिष्ठा पणाला लावल्याचा आरोप केला गेला आहे. यानंतर शाळा प्रशासनाने तिचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे. त्यानंतर या शिक्षिकेने आपली बाजू जाहीरपणे सर्वांसमोर मांडली आहे.

'डेली स्टार'च्या बातमीनुसार, हे प्रकरण इंडियाना, अमेरिकेतील आहे, जिथे सारा सील्स नावाच्या महिला शिक्षिकेने ओन्ली फॅन्सवर खाते उघडले, ज्यामुळे तिला नोकरी गमावावी लागली आहे. सारा काम करत असलेल्या या इन्स्टिट्यूटने आरोप केला आहे की, तिने तिच्या फोटोंमुळे संस्थेची प्रतिष्ठा खराब केली आहे. यासोबतच शाळा, शेअर होल्डर आणि त्याच्याशी संबंधित भागधारकांनाही यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

त्यामुळेच स्टारबेसने साराला तत्काळ कामावरून काढून टाकले आहे. परंतु यानंतर साराला आपल्या सोशल मीडियाच्या कमाईवरुन घर चालवावे लागले आहे.

ओन्ली फॅन्स प्लॅटफॉर्मवर साराच्या चाहत्यांची कमी नाही लाखोंच्या संख्येने लोक साराला फॉलो करतात. साराने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या रिपोर्टरवर आपलं करिअर उद्भवस्त केल्याचा आरोप लावला आहे, ज्याच्यामुळे तिच्या या खात्याबद्दल सर्वांसमोर उघड झाले आहे.

आता साराने तिच्या चाहत्यांना तिचे खाते सबस्क्राईब करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून तिला कमाईचे साधन मिळेल.

साराने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना आवाहन केले आणि म्हणाली की, ''कृपया माझ्या फक्त फॅन्सच्या खात्यात सामील व्हा कारण मला शिक्षकाच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे. मला तुमची गरज आहे आणि तुमच्या प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. आता साराला आशा आहे की ती तिच्या सेक्सी फोटोंद्वारे प्लॅटफॉर्मवरून मोठी कमाई करू शकेल कारण तिच्या नोकरीवरून काढून टाकल्यानंतर तिच्याकडे तसे करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.''

साराची पूर्वीची संस्था स्टारबस शाळा आणि लष्करी दल जवळून काम करत आहे. यामुळेच साराच्या या अकाउंटवरील फोटोंवर लोकांना आणि शाळेला आक्षेप होता. कारण तिचं असं वागणं हे सुरक्षा दलांच्या अपमाना सारखं आहे.

पुढे सारा म्हणाली, "व्यासपीठाचा कितीही गैरवापर होत असला तरी ते माझ्यासाठी सशक्त होण्याचे माध्यम आहे आणि त्यासाठी मी माझी सर्व शक्ती पणाला लावायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले."