ड्रोनला विसरा आता थेट Flying Man तुम्हाला डिलीव्हरी पोहोचवणार, VIDEO आला समोर

खरंच उडणारा माणूस तुमच्या फुडची डिलीव्हरी करणार, विश्वास बसत नाहीए तर हा VIDEO पाहा 

Updated: Sep 26, 2022, 01:51 PM IST
ड्रोनला विसरा आता थेट Flying Man तुम्हाला डिलीव्हरी पोहोचवणार, VIDEO आला समोर  title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social media)अनेक व्हिडिओ व्हायरल (video viral)होत असतात. यातील काही व्हिडिओ खूप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच आश्चचर्यचजनक असतात. हे व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. नेमकं या व्हिडिओत काय आहे ते जाणून घ्या. 

व्हिडिओत काय? 
व्हिडिओत एक व्यक्ती दिसत आहे.जी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उडताना दिसत आहे. एका उच्च इमारतीत ती दाखल होते आणि समोरील व्यक्तीला वस्तु डिलीव्हर (Delievery boy)करते. या व्यक्तीला फ्लाईंग मेन (Flying Man)असे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आनंद झाला आहे. कारण आता त्यांची डिलिव्हरी वेळेत होणार आहे. एखादी फुड डिलिव्हरी असो, अथवा एखादी वस्तु नागरीकांपर्यंत वेळेत पोहोचणार आहे. 

दरम्यान आतापर्यत आपण बाईकने फुड डिलिव्हरी (Delievery boy) करताना अनेक डिलिव्हरी बॉयना पाहिले असेल. मात्र निकृष्ट रस्ते आणि ट्राफीक अभावी डिलीव्हरी देण्यास खुपच उशीर होतो. यामध्ये दोघांचा संताप होतो. मात्र आता या दोन्ही समस्या आता फ्लाईंग मेन (Flying Man) सोडवणार आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by CRAZY JATTS (@crazy_jatts)

'या' ठिकाणी सर्विस सुरू
सौदी अरेबियामध्ये अशाप्रकारे जेटपॅकद्वारे फ्लाईंग मेन कुरिअर डिलिव्हरी करत आहे. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अशी सर्विस त्यांच्या शहरात सुरू व्हावी अशी अपेक्षा ते करत आहेत. 

मुंबईतल्या डिलिव्हरी बॉयना (Delievery boy)डिलिव्हरी करताना अनेक समस्यांना सामोर जावे लागते.निकृ्ष्ट रस्ते आणि ट्राफीकमुळे डिलिव्हरी करताना डिलिव्हरी बॉयना (Delievery boy)अनेक समस्या सोसाव्या लागतात. त्यामुळे जर मुंबईत अशी सर्विस सुरु झाल्यास डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकांना फायदा होणार आहे.