Video: गळ्यात घास अडकल्यानं तब्येत बिघडली, हॉटेल कर्मचाऱ्याने असा वाचवला जीव

घरी जेवण नसलं की आपण हॉटेलचा रस्ता पकडतो. मसालेदार डिश खाल्ल्याने त्रास देखील होतो. पण नाईलाज असल्याने आपण असे पदार्थ खातो. पण एका व्यक्तीला हॉटेलमध्ये (Hotel) जेवत असताना घास बसला आणि जीवाच्या आकांताने तडफडू लागला. त्यामुळे आसपासच्या टेबलवर बसलेले इतर ग्राहक घाबरले. 

Updated: Oct 14, 2022, 01:47 PM IST
Video: गळ्यात घास अडकल्यानं तब्येत बिघडली, हॉटेल कर्मचाऱ्याने असा वाचवला जीव title=

Viral Video From Restaurant: घरी जेवण नसलं की आपण हॉटेलचा रस्ता पकडतो. मसालेदार डिश खाल्ल्याने त्रास देखील होतो. पण नाईलाज असल्याने आपण असे पदार्थ खातो. पण एका व्यक्तीला हॉटेलमध्ये (Hotel) जेवत असताना घास बसला आणि जीवाच्या आकांताने तडफडू लागला. त्यामुळे आसपासच्या टेबलवर बसलेले इतर ग्राहक घाबरले. गंभीर स्थिती पाहता हॉटेलमधील महिला कर्मचारी देवदूतासारखा धावून आली. महिला कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत सदर व्यक्तीचा जीव वाचवला. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Viral Video On Instagram) अनेक युजर्सनी शेअर केला आहे. इतर सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये, सदर ठिकाण एखाद्या रेस्टॉरंटसारखे दिसत आहे आणि काही जण एका टेबलवर बसून जेवत आहेत.  यादरम्यान एका व्यक्तीच्या घशात घास अडकला आणि त्याचा श्वास गुदमरला. त्याला खूप त्रास होऊ लागला. त्याचवेळी पाठीमागे असलेल्या दुसऱ्या टेबलावर महिला कर्मचारी जेवण देण्यासाठी आली होती.  ग्राहकाला अशा स्थितीत पाहून तिने त्याला मागून पकडले. तसेच प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात केली. हेमलिच उपचाराने तिने त्या व्यक्तीचा जीव वाचवला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नादच खुळा! नव्या बाइकला हार घालायचं सोडून तिच्या गळ्यात...Video Viral

goodnews_movement नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. महिला कर्मचाऱ्याने उचलेलं पाऊल प्रभावी ठरल्याचं व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं. सोशल मीडियावर त्या महिला कर्मचाऱ्याचं कौतुक केलं जात आहे. युजर्स आपल्या प्रतिक्रिया व्हिडीओखाली देत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "ही तर सुपर वूमन आहे. खरंच तिच्या कृतीचं कौतुक". दुसऱ्या कर्मचाऱ्याने लिहिलं आहे की, "टेबलवर बसलेले इतर लोकं काय करताहेत. त्यांना आपल्या सहकाऱ्याची काळजी वाटत नाही."