close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पाकिस्तानातील माजी आमदाराची भारताकडे आश्रयाची मागणी

पाकिस्तानचे  माजी आमदार बलदेव कुमार भारताकडे आश्रय मागितला आहे. 

Updated: Sep 10, 2019, 11:00 AM IST
पाकिस्तानातील माजी आमदाराची भारताकडे आश्रयाची मागणी

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाचे माजी आमदार बलदेव कुमार भारताकडे आश्रय मागितला आहे. त्यांनी भारताकडे कुटुंबासह आश्रय मागितला आहे. 

पाकिस्तानमध्ये हिंदू, शीखांच्या हत्या होत असून ते असुरक्षित असल्याचे बलदेव कुमार म्हणाले आहेत. बलदेव कुमार हे खैबर पख्तुनवामधल्या बारीकोट मतदारसंघाचे आमदार होते. सध्या ते आपल्या कुटुंबासह पंजाबमध्ये असून त्यांनी भारताकडे आश्रय मागितला.