Ganesh Chaturthi 2022 Trending video: देशात सर्वत्र गणशोत्सव मोठ्या थाट्यामाट्यात साजरा केला जातो आहे. कुठे दीड दिवसांचा तर कुठे पाच तर कुठे 10 दिवसांसाठी बाप्पा घरोघरी विराजमान झाला आहे. सार्वजनिक मंडळातही गणेशभक्तांची गणरायाचा दर्शनासाठी रीघ लागली आहे. विदेशातही अनेक ठिकाणी गणरायाचं आगमन जल्लोषात करण्यात आलं. सध्या सोशल मीडियावर असाच एक परदेशातील गणरायाचा जल्लोषाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (ganesh chaturthi 2022 celebrations in africa trending video on social media)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता आफ्रिकेतील लोक मोठ्या जल्लोषात ढोल वाजून गणरायाचं नाचत गाजत स्वागत करण्यात आलं. आफ्रिकन आपल्या परीने गणपती बाप्पा मोरया असं म्हणताना दिसतं आहेत. आफ्रिकन स्टाइल ढोल वाजत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. हा व्हिडीओ पाहून गणेशभक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Auspicious Celebrations of Ganesh chaturthi in South Africa !! pic.twitter.com/zOsWUtuAOm
— Raghu (@IndiaTales7) August 31, 2022
हा व्हिडिओ ट्विटरवर @IndiaTales7 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, आफ्रिकेत गणेश चतुर्थीचा शुभ उत्सव !! आतापर्यंत या व्हिडीओला 6 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत.