हनिमूनला गेलेल्या पत्नीसमोर आलं पतीचं धक्कादायक सत्य आणि....

 प्रत्येक मुलगी लग्नानंतरची नवीन स्वप्न रंगवत असते. हातावरची मेहेंदी उतरण्याआधी तिच्या गुलाबी स्वप्नांचा चुराडा पहिल्याच हनिमूनच्या रात्री झाला. 

Updated: Jun 21, 2021, 09:33 AM IST
हनिमूनला गेलेल्या पत्नीसमोर आलं पतीचं धक्कादायक सत्य आणि....

मुंबई: प्रत्येक मुलगी लग्नानंतरची नवीन स्वप्न रंगवत असते. हातावरची मेहेंदी उतरण्याआधी तिच्या गुलाबी स्वप्नांचा चुराडा पहिल्याच हनिमूनच्या रात्री झाला. या घटनेमुळे पत्नीला मोठा धक्का बसला. हनीमूनच्या पहिल्या रात्रीच पतीचं धक्कादायक सत्य समोर आलं आणि पत्नीला मोठा धक्का बसला. 

ब्रिटनमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे रायना उर्फ जॅक आणि जे हार्वे लवकरच लग्न करणार आहेत. यावेळी लग्न थोडे वेगळे असेल कारण यात वधू-वर नसतील तर दोन नववधूंचा सहभाग असेल.  जॅकचा सेक्स बदलला आणि आता ती रायना म्हणून ओळखली जाते. दोघांची लव्ह स्टोरी खूप रंजक आहे.  2018 मध्ये दोघांनी अमेरिकेच्या टेक्सासमध्ये लग्न केलं होतं.

हनीमून दरम्यान हार्वेला समजलं की तिने लग्न केलेले मुलगा खरंतर ट्रान्सजेंडर आहे. असे असूनही, त्यांचे संबंध बिघडले नाहीत जेकनं लिंग परिवर्तनाचा निर्णय घेतला. मिररने दिलेल्या वृत्तानुसार रायना उर्फ जॅकने शस्त्रक्रिया करून स्त्री होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तब्बल 45 हजार पाउंड म्हणज जवळपास 46 लाख रुपये खर्च देखील केले. 

रायना आणि जे हार्वी पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांनी लग्नासाठी तयारी देखील सुरू केली आहे. रायनाने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ती 11 वर्षांची होती तेव्हापासून आपण स्त्री असावं असा विचार सतत मनात यायचा. लग्नानंतर आपल्या पत्नीला जॅकने सत्य सांगितलं आणि त्यानंतर मनावरचं ओझं हलकं झाल्याची भावना व्यक्त केली. 

रायना उर्फ जॅकची ओळख ऑनलाइन झाली होती. हार्वी मूळची अमेरिकेची आहे. 2007मध्ये एका वेबसाईटवरून या दोघांची ओळख झाली. 2018मध्ये त्यांनी टेक्सास इथे लग्न केलं. लग्नानंतर हनीमूनला जाताच जॅकने आपल्याला वाटत असलेल्या भावना व्यक्त केल्या. या घटनेनं पत्नीला काही वेळासाठी धक्का बसला होता. मात्र पत्नीने समजूदारपणा दाखवला. 

जे हार्वी खंबीरपणे जॅकच्या पाठीशी उभी राहिली. इतकंच नाही तर लिंग परिवर्तनासाठी देखील तिने मदत केली. या दोघांनी मिळून या सर्जरीसाठी 45 हजार पाउंड खर्च केला. आता पुन्हा एकदा जे हार्वी आणि रायना लग्न करणार आहेत.