रशिया अमेरिकेवर अणुबॉम्बचा हल्ला करू शकतो का? सर्वेमध्ये धक्कादायक खुलासा

रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिका देखील हस्तक्षेप करीत आहे. रशिया अमेरिकेवर तर नाही ना अणुबॉम्ब टाकणार अशी चिंता अमेरिकेतील लोकांना सतावत आहे.

Updated: Mar 28, 2022, 03:27 PM IST
रशिया अमेरिकेवर अणुबॉम्बचा हल्ला करू शकतो का? सर्वेमध्ये धक्कादायक खुलासा  title=

वाशिग्टन : युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे अमेरिकेतील नागरिकांना चिंतेत टाकलं आहे. अमेरिकेने युद्धात हस्तक्षेप केल्यास किंवा सामिल झाल्यास अणुयुद्ध भडकू शकते. एका नवीन सर्वेतून जगाला चिंतेत टाकणारा अहवाल समोर आला आहे. 

अमेरिकेच्या नागरिकांच्या चिंतेत वाढ
एसोशिएटेड प्रेस - एनओआरसी सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स आणि रिसर्चच्या नवीन सर्वेनुसार साधारण अर्धापेक्षा जास्त अमेरिकी नागरिकांचे म्हणणे आहे की,  रशिया अण्वस्त्राने अमेरिकेवर हल्ला करू शकतो. यामुळे आम्ही चिंतेत आहोत. 

पुतिन यांचे अण्वस्त्र हाय अलर्टवर 
एजन्सीच्या वृत्तानुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 24 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर लगेचच आपल्या देशाच्या आण्विक सैन्याला हाय अलर्टवर ठेवले. अंदाजे 10 पैकी 9 अमेरिकन किमान काहीसे चिंतित आहेत की पुतिन युक्रेनविरूद्ध अण्वस्त्र हल्ला करू शकतात.

संशोधकांचे मत
रॉबिन थॉम्पसन, एमहर्स्ट, मॅसॅच्युसेट्स येथील निवृत्त संशोधक म्हणाले, "रशिया नियंत्रणाबाहेर आहे आणि तसेच रशिया आता आक्रमक होताना कोणाचीही चिंता करणार नाही.  नक्की रशियाला काय हवंय कळत नाही. त्यात रशिया अण्वस्त्रधारी आहेच.

71 टक्के अमेरिकी नागरिकांचे म्हणणे आहे की, रशिया आणि युक्रेनच्या आक्रमणामुळे जगात कोठेही अण्वस्त्रांचा प्रयोग होण्याची शक्यता वाढली आहे. 

उत्तर कोरियाच्या अणुबॉम्ब निर्मितीमुळेही अमेरिकी नागरिक चिंतेत
एका सर्वेक्षणानुसार उत्तर कोरियातर्फे आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे परिक्षण केले गेले. या सर्वेनुसार अमेरिकेचे नागरिक उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळेदेखील चिंतीत आहे.