ब्राझीलच्या चलनाची किंमत घसरल्याने साखरेचे दर गडगडले

राज्यातील साखर कारखानदारांना निर्यात परवडत नाही.

Updated: Aug 24, 2018, 08:39 PM IST
ब्राझीलच्या चलनाची किंमत घसरल्याने साखरेचे दर गडगडले title=

रिओ दि जानेरो: ब्राझीलच्या चलनाची किंमत घसरल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर गडगडले आहेत. परिणामी साखरेच्या दरांनी गेल्या दहा वर्षातील निचांकी पातळी गाठली आहे. भारताला याचा मोठा फटका बसणार आहे. 

दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर प्रति टन ६०० डॉलर इतका होता. तो घसरून प्रति टन ३०६ डॉलरवर म्हणजे निम्यावर आला आहे. म्हणजे सारखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात २१ रूपये किलोचा दर मिळाला होता.

त्यामुळे राज्यातील साखर कारखानदारांना निर्यात परवडत नाही. गेल्या गळीत हंगामात ३२२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यामधील १०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक असून ती निर्यात होणे अपेक्षित होते.

येत्या गळीत हंगामात सुमारे ३५५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल. देशांतर्गत साखरेची गरज वार्षिक २५५ लाख मेटृीक टन इतकी असल्याने पुन्हा १०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहील. म्हणजे २०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहणार आहे. ही परिस्थीती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना साखर कारखान्यांना एफआरपी देणे शक्य होणार नाही.

Tags: