Zombie Pigeons: युनायटेड किंगडम हा देश आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरलं आहे या देशातील कबुतरं. UK मधील कबुतरांना एका भयंकर आजाराने ग्रासलं असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच तिथली कबुतरे इंग्रजी सिनेमांमधील 'झॉम्बी' सारखी वागायला लागली (Pigeons turns into zombie) आहेत. तुम्ही या कबुतरांचा हा व्हिडीओ पाहाल तर तुम्हालाही सुरवातीला भीती वाटू शकते आणि धक्काही बसू शकतो. कबुतरांवरील न्यूरॉलॉजिकल परिणामांमुळे म्हणजेच त्यांच्या मेंदूवर झालेल्या परिणामांमुळे ही कबुतरे आपले पंख विचित्र पद्धतीने फडफडवतात, सोबत त्यांची मानदेखील वाकडी झालेली पाहायला मिळते. अशी कबुतरे उडणे सोडाच हालचाल करण्यासही असमर्थ ठरतात. या कबुतरांना हिरव्या रंगाची विष्ठा होते. असाच एका व्हायरसग्रस्त कबुतराचा (Virus in birds) व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळतो. loftyhopespigeonpositive या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये मान वाकडी केलेला कबुतर पाहायला मिळतो. या विशिष्ट आजारालान्यूकॅसल डिसीज ( Newcastle’s disease ) देखील संबोधलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार हा नवा आजार म्हणजे न्यूरॉलॉजिकल लक्षणे आहेत. (Pigeons Zombie)
दरम्यान, याआधीच इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस (IFS) चे अधिकारी डॉक्टर सम्राट गौडा यांनी एका मृत कीटकाचा झॉम्बी सारखा ( Zombie Insects) चालतानाचा व्हिडीओ शेअर करण्यासाठी ट्विटरची मदत घेतलेली. हा व्हिडीओ पाहून अनेकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. या अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे हा कीटक चालण्यास सक्षम होता कारण या कीटकाच्या मेंदूवर परजीवी व्हायरसचा ताबा होता. या क्लिपमध्ये या कीटकाचा व्हिडीओ पूर्णपणे छिन्न भिन्न झालेला होता, मात्र अशातही हा कीटक गवतावरून चालताना पाहायला मिळत होता. या विचित्र वागण्यामागील कारण एका IAS अधिकाऱ्याने सांगितलं. एका परजीवी व्हायरसने हा कीटकाच्या मांडूवर ताबा मिळवला आणि त्याला चालण्या फिरण्यास भाग पाडलं. म्हणजेच एका झॉम्बी सारखं वागण्यास भाग पाडलं. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालेला पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणसांमध्येही असं होऊ शकतं का? असा सवाल उपस्थित केला आहे.
युनायटेड किंगडममधील हा कबुतरांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतो. व्हिडिओमधील कबुतर पैरामाइक्सोव्हायरस PPMV ने ग्रस्त असल्याचं समजतंय. यामध्ये या पक्ष्याचे पंख कापतात आणि मान विचित्र पद्धतीने वाकडी झाल्याचं पाहायला मिळते. यामुळे हे कबुतर उडणे तर सोडा चालूही शकत नाही. कबुतरांसाठी हे अत्यंत घातक असल्याचं समजत. JSPA पशु आश्रय प्रवक्ते याबाबत बोलताना म्हणाले की, "गेल्या काही काळात अशा प्रकारच्या पक्ष्यांची संख्या वाढलेली पाहायला मिळतेय. अनेक प्रभावित पक्ष्यांमध्ये मान वाकडी करणे, गोल गोल फिरणे, उभं राहता न येणे अशा समस्या पाहायला मिळतात. या प्रवक्त्यांच्या माहितीप्रमाणे ही लक्षणे पॅरामाइक्सोव्हायरसची (Paramyxovirus) आहेत.
highly contagious disease turn british pigeons into zombie birds with twisted necks and trembling wings viral news marathi