Tom Cruise Heater Man: हॉलिवूड सेलिब्रेटींची लक्झरी किंवा ऐशोरामाची (Celebrity Luxuary) जिंदगी काय असते याबद्दल अनेकदा सोशल मीडियावरून पाहत असतोच. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या या कलाकरांकडे साधं असं म्हणण्यासारखं काही असेल तर नवलंच कारण येत्या जाता, उठता बसता या मंडळींकडे पैशांशिवाय बोललण्यासारखे काही नसेलच. जगातील कुठंलीही वस्तू ते सहज विकत घेऊ शकतात. त्यामुळे या हॉलिवूड कलाकारांनीही काहीही विकत घेतलं की, यांची तर काय बातच न्यारी! असं आपण म्हणतो आणि ते खरंच आहे. (hollywood actor tom cruise hires a bodyguard with heater to follow hima at oblivion premiere dublin)
त्यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या गाड्यांपर्यंत आणि त्यांच्या लक्झरीयस हाऊसपासून ते त्यांच्या महागड्या लग्नसराईपर्यंत सगळ्यांचीच एकच चर्चा असते. सध्या त्याचेच एक हुबेहूब उदाहरण समोर आले आहे ते म्हणजे टॉम क्रुझचे. अभिनेता टॉम क्रुझबद्दल (Tom Cruise) कोणाला माहित नाही? हा अभिनेता अख्ख्या जगात फेमस असून वयाच्या 60 व्या वर्षीही तो तितकाच चिकणा वाटतो.
या हॉलिवूड सेलिब्रेटींकडे तुम्हाला जर काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही पहिला कोणता जॉब स्विकाराल? या हॉलिवूड कलाकारांच्या घरी काम करण्याची संधी जर का कोणाला मिळाली तरी एखादी फॅन व्यक्ती आरामात ती स्विकारेल. परंतु येथे गोष्ट जरा निराळी आहे. टॉम क्रुझ या अभिनेत्यानं चक्क आपल्याला गरमाहट मिळावी म्हणून एका माणसाला त्याच्यासाठी हीटर धरण्यासाठी कामावर ठेवले. तुम्हाला याची उत्सुकता लागून राहिलीच असेल की, या माणसाचा नक्की पगार तरी किती असेल? कारण वर म्हटल्याप्रमाणे टॉम क्रुझ किंवा त्याच्यासारख्या बड्या सेलिब्रेटींच्या जागी जर का कोणी दुसरा सेलिब्रेटी असता तर त्याच्या घरी घरकाम करायला कोणीही तयार झालं असतं. कारण तुम्हाला पगार (Tom Cruise Bodyguard Salary) हा घसघशीतच मिळेल.
टॉम क्रुझ हाही त्याच सेलिब्रेटींमधलाच आहे जो या जगातील कोणतीही वस्तू आरामात खरेदी करू शकतो. पण तोही माणसासारखा माणूसच आहे हो, त्यालाही तुमच्या आमच्यासारखी थंडी वाजूही शकतेच की, मग त्यानं काय करावं? तो तर चांगलाच श्रीमंत आहे त्यामुळे त्याला त्याच्यासाठी, त्याची थंडी भागवण्यासाठी हिटर (Heater Man) घेऊन त्याच्या उब देण्यासाठी एक माणूस त्या कामाासाठी ठेवला तर काय बिघडलं? तुम्ही म्हणाल की, टॉम क्रुझ नक्की गेला तरी कुठे होता की त्याला चक्क थंडीत गर्मी मिळावी म्हणून हीटरवाला नेमावा लागला.
टॉम क्रुझनं चक्क रेड कार्पेटवर आपल्या मागे चक्क हिटर घेऊन फिरण्यासाठी एका माणसाला पैसे देऊन कामावर ठेवले आहे. हा त्याचा बॉडिगार्ड आहे जो त्याच्या बरोबर मागे उभा राहिलेला आहे. काळ्या शर्टमध्ये असल्याने त्याला मेन इन ब्लॅक म्हणून नेटकरी म्हणत आहे. रेड कार्पेटवर टॉम क्रुझनं असं का बरं केलं असेल याकडे नेटकऱ्यांनी फारसे लक्ष दिले नाही त्याला ट्रोल (Netizens Trolled Tom Cruise) करण्याकडेच सगळ्यांचे लक्ष वेधले होते. परंतु असं कारण देता येईल की रेड कार्पेटवर आपल्याला प्रेझेंटेबलच राहावं लागतं.
त्याचबरोबर अति थंडी असते तेव्हा तुम्ही स्वेटशर्ट वैगेर वापरू शकता त्यातून तसा फॅशन ट्रेण्डही सेट होतो परंतु काही वेळापुरती जर का तुम्हाला ही गरज असेल तर तुम्हाला असं काहीतरी करायला हरकत नाही. परंतु येथे सगळं सोबत असूनही हिटरची एक्स्ट्रा सर्व्हिस टॉम क्रुझनं मात्र करू घेतली आहे. 'ऑब्लिवन' (Oblivion) या चित्रपटाच्या प्रमियरचा सोहळा ड्यूबलिन (Dublin) येथे आयोजित करण्यात आला होता.
— Shane D'Alton (@ShaneDAlton12) February 3, 2023
सध्या टॉम क्रुझला मात्र नेटकरी चांगलेच ट्रोल करत आहेत. अनेक जण त्याच्या या वागणूकीवर थट्टा - मस्करी करत आहेत तर काही जणं त्याच्या बाजूनंही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा टॉम क्रुझचा बॉडीगार्ड आहे. त्याच्या बॉडिगार्डची सॅलरी ही 40,000 ते 1,45,000 USD एवढा तरी असतो. परंतु या कामावर ठेवलेल्या बॉडिगार्डचा पगार किती याबद्दल काही माहिती समोर नाही.
QAT
(17.4 ov) 101
|
VS |
SDA
100/7(20 ov)
|
Qatar beat Saudi Arabia by 1 run | ||
Full Scorecard → |
RWA
(19.4 ov) 102
|
VS |
BRN
105/2(17.2 ov)
|
Bahrain beat Rwanda by 8 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.