मुंबई : जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचं सर्व्हर सोमवारी मध्यरात्री जवळ-जवळ 6 तासांसाठी डाऊन झालं होतं. ज्यामुळे फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्गला कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. झुकरबर्ग यांना 7 बिलीयन डॉलर म्हणजे जवळपास 52 हजार कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. काही तासांत झालेल्या या मोठ्या नुकसानामुळे त्यांनी श्रीमंतांच्या यादीत असलेलं त्याचं नाव देखील गमावलं आहे. एवढंच नाही फेसबूकचे शेअर देखील घसरले आहेत.
फेसबुकचा सर्व्हर डाऊन झाल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात फेसबुकचे शेअर्स प्रचंड घसरले आहे. फेसबूकचे शेअर एकाच दिवसात 5 टक्क्यांनी घसरले आहेत. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हे शेअर्स15 टक्क्यांपर्यंत घसरले होते. Bloomberg Billionaires Indexच्या रिपोर्टनुसार, फेसबुकला झालेल्या नुकसानामुळे मार्क झुकेरबर्गची संपत्ती 120.9 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे.
त्यामुळे झुकरबर्ग आता श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. श्रीमंतांच्या यादीत झुकरबर्ग यांचस्थान चौथ्या क्रमांकावर होतं. 13 सप्टेंबरपर्यंत झुकरबर्गयांच्या नेटवर्थमध्ये 19 मिलियन डॉलरची घट झाली आहे. आता देखील फेसबुक डाऊन झाल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
.