पंतप्रधान यांचे घर जाळलं! खासदाराचा मृत्यू ; श्रीलंकेची स्थिती भयंकर

संतप्त जमावाने श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांचे घर जाळून टाकले आहे. श्रीलंकेत झालेल्या हिंसाचारात अनेक जण ठार झाले. तर एका खासदाराचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती आहे

Updated: May 10, 2022, 07:59 AM IST
पंतप्रधान यांचे घर जाळलं! खासदाराचा मृत्यू ; श्रीलंकेची स्थिती भयंकर  title=

कोलंबो:  (Colombo)श्रीलंकेची ( Sri Lanka) आर्थिक स्थिती संपूर्ण ढासळली आहे. अखेर या ढासळणाऱ्या स्थितीला सावरण्यात पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa )अपयशी ठरले. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीमाना दिला आहे. राजीनाम्यानंतर श्रीलंकेची स्थिती अधिक भयावह झाली आहे. संतप्त जमावाने श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांचे घर जाळून टाकले आहे. श्रीलंकेत झालेल्या हिंसाचारात अनेक जण ठार झाले. तर एका खासदाराचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

 

खासदाराची हत्या! 

श्रीलंकेतील हिंसाचार इतका टोकाला गेला आहे तिकडे एका खासदाराचा मृत्यू झाला आहे . श्रीलंका पोदुजामा पेरामुनाचे (SPP) खासदार अमरकिर्ती अतुकोराला (amarkirti athukorala)  यांना पोलोन्नाकरुआ जिल्ह्यात सरकारविरोधी गटाकडून घेरण्यात आलं. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून खासदाराने पळ काढला. त्यांनी एका इमारतीमध्ये आश्रय घेतला. मात्र तिकडे संपूर्ण जमाव पोहोचल्यानंतर तिकडे खासदाराचा मृतदेह आढळून आल्याचं कळतं. 

खासदारांच्या घरावर सुद्धा हल्ला

श्रीलंकेतील खासदार सनथ निशांत ( sanath nishantha) आणि जॉन्सन फर्नांडो यांचे घर देखील जमावाने आगीच्या हवाली केल्याची माहिती मिळतेय. महिंदा राजपक्षे समर्थक राजधानी सोडून पळ काढत आहे. नेते मंडळींच्या गाड्या अनेक ठिकाणी आडवल्या जात आहेत. देशातली महत्त्वाच्या शहरात हिंसाचार उफाळला आहे. संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्यानंतर अवघ्या काही तासांतच हिंसाचाराने रौद्र रुप धारण केलं.