15 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन कसा गायब झाला ऑस्ट्रेलियातील अर्गोलँड खंड; संशोधकांचा सर्वात मोठा खुलासा

375 वर्षांपासून पृथ्वीवरुन गायब असलेला 8वा खंड संशोधकांना समुद्रात सापडला. यानंतर आता 15 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन कसा गायब झाला ऑस्ट्रेलियातील अर्गोलँड खंड याबाबत संशोधकांनी मोठा खुलासा केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Nov 5, 2023, 06:33 PM IST
15 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन कसा गायब झाला ऑस्ट्रेलियातील अर्गोलँड खंड; संशोधकांचा सर्वात मोठा खुलासा  title=

Argoland Continent: पृथ्वी ही अनेक रहस्यांनी भरलेली आहे. यातील अनेक रहस्य उलगडण्याच संशोदक प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांना यश येत आहे. असेच एक मोठं रहस्य संशोधकांनी उलगडले आहे.  ऑस्ट्रेलियातील अर्गोलँड खंड हा 15 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन गायब झाला होता. हा खंड नेमका कसा लुप्त झाला याबाबत संशोधकांनी सर्वा मोठा खुलासा केला आहे. 

शास्त्रज्ञांनी नुकतेच अर्गोलँड नावाच्या हरवलेल्या खंडाचे रहस्य उलगडले आहे.  हा प्राचीन भूभाग 155 दशलक्ष म्हणजेच 15 कोटी वर्षांपूर्वी पश्चिम ऑस्ट्रेलियापासून वेगळा झाला होता असा दावा संशोधकांनी केला आहे. या खंडाचे तुकडे तुकडे होऊन तो सर्वत्र विखुरला गेला आणि पूर्णपणे नष्ट झाला. 

पृथ्वीवरुन कसा गायब झाला हा खंड

पृथ्वीच्या अंतर्भात होणाऱ्या टेक्टोनिक क्रियाकलापांमुळे आर्गोलँड संपूर्ण आशियामध्ये विखुरला गेला आणि लुप्त झाला असा खुलासा संशोधकांनी केला आहे. ऐतिहासिक भूवैज्ञानिक पुराव्यांच्या मदतीने याचा उलगडा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या वायव्य किनार्‍याजवळ खोल समुद्राच्या खोऱ्यातील अर्गो अबिसल मैदानात यासंबंधीचे पुरावे सापडले आहेत. 120 दशलक्ष वर्षांपूर्वी महाखंड गोंडवानापासून वेगळे झालेला भारतीय उपखंड अजूनही शाबूत आहे. याउलट, अर्गोलँडचे अनेक तुकडे झाले. खंडाचे तुकडे कोठे संपले याबद्दल शास्त्रज्ञ देखील ठोसपणे सांगू शकत नाहीत. 

विभक्त खंडाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न  

संशोधनादरम्यान संशोधकांना इंडोनेशिया आणि म्यानमारच्या आसपास विखुरलेले प्राचीन जमिनीचे तुकडे सापडले.   विभक्त खंडाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न  संशोधकांकडून करण्यात आला. अर्गोलँडच्या उत्तरेकडील अर्थात आग्नेय आशियातील पुरावे गोळा करण्यात आले. मात्र, या पुराव्यांचा एकेकांशी ताळमेळ जमला नाही.  200 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या लहान महासागरांचे अवशेष सापडले. हा खंड लुप्त होण्याआधीच विखुरलेला होता असे नेदरलँड्समधील उट्रेच विद्यापीठातील पृथ्वी विज्ञानाचे संशोधक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक एल्डर एडवोकाट यांनी सांगितले. 

375 वर्षांपासून पृथ्वीवरुन गायब असलेला 8वा खंड शोधण्यात भुवैज्ञानिकांना यश

375 वर्षांपासून पृथ्वीवरुन गायब असलेला 8वा खंड शोधण्यात संशोधकांना यश आले. भुवैज्ञानिकांनी जगातल्या आठव्या खंडांचा शोध लावला. त्याला 'झीलँडिया' नाव देण्यात आले. याआधी झीलँडिया चा शोध 381 वर्षांपुर्वी लागला होता. या खंडाचा 94 % भाग पाण्याखाली आहे. केवळ 6 % भाग पाण्याच्या वर आहे..भुवैज्ञानिकांनी या पाण्यात बुडालेल्या खंडाचा नवा नकाशाही  तयार केला आहे.