Surya Grahan 2023 live Video : भारतात ग्रहण दिसणार नाही आहे. पण अनेकांना खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रेमींना सूर्यग्रहण कसं दिसतं. यंदा 100 वर्षांनंतर हायब्रिड सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यामुळे अनेकांना उत्सुकता आहे. आता भारतात सुद्धा तुम्हाला घरी बसल्या सूर्यग्रहण पाहता येणार आहे. लाइव्हस्ट्रिमिंगद्वारे तुम्ही हे सूर्यग्रहण पाहू शकणार आहात.
जेव्हा आंशिक, पूर्ण, कंकणाकृती आणि संकरित अशा चार स्वरुपांत दिसणार आहे. नेमकं जेव्हा चंद्र सूर्याच्या एका छोट्या भागासमोर येतो. तेव्हा काही आंशिक सूर्यग्रहण होतं. त्यानंतर चंद्र सूर्याच्या मध्यभाग येतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होतं. पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत असताना पूर्ण सूर्यग्रहण होतं. अशावेळी पृथ्वीवर अंधार पडतो. हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नयेत.