मुंबई : आपण सोशल मीडियासाईटचा वापर आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी, त्यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी whatsaap चा वापर करतो. येथे लोकांशी गप्पा मारताना आपण अनेकदा इमोजीसचा वापर करतो. इमोजीसमुळे लोकांना मित्रांशी गप्पा मारणे आणखी सोपं झालं आहे. कारण लोकांना आता फक्त इमोजीसचा वापर करुन अगदी कमी शब्दात आपल्या भावना मांडता येतात.
परंतु जर तुम्हाला सांगितलं की, आता जर तुम्ही कोणाला गप्पा मारताना रेड हार्ट इमोजी पाठवाल तर तुम्ही जेलमध्ये जाल. असं जर तुम्ही कोणाला पाठवाल तर तुम्हाला सायबर पोलिस पकडून घेऊन जाऊ शकतात, त्यामुळे आता यापुढे कोणाशी बोलताना जरा सांभाळून.
खरेतर हा नियम भारतात नाही तर साऊदीमध्ये लावला गेला आहे. येथील सायबर एक्सपर्टने सांगितले की, जर तुम्ही कोणालाही रेड हार्ट इमोजी पाठवलात आणि समोरील माणसाने तुमची तक्रार पोलिसात केली, तर तुम्हाला दोन ते पाच वर्षापर्यंत जेल होऊ शकते. एवढेच नाही तर तुम्हाला 100,000 सऊदी रियाल (म्हणजेच 19,90,328 रुपये) दंड देखील आखला जाऊ शकतो.
सौदी अरेबियातील अँटी फ्रॉड असोसिएशनचे सदस्य अल मोअताज कुताबी यांनी याकडे लक्ष वेधले की, व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट पाठवणे कायद्यानुसार "छळवणूक करणारा गुन्हा" आहे. समोरच्या व्यक्तीने तक्रार केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. परंतु, कारवाई करण्यापूर्वी त्या व्यक्तीला कायद्यानुसार समोरील व्यक्ती दोषी आहे हे सिद्ध करावे लागेल.
अहवालात असे म्हटले आहे की, छळविरोधी कोणतेही विधान, कृत्य किंवा हावभाव ज्याने शरीराला, समोरच्या व्यक्तीची प्रतिष्ठा दुखावते. त्यात व्हॉट्सअॅपचा देखील समावेश आहे. त्यामुळे तुम्ही कोणाचीही प्रतिमा दुखवू शकत नाही. त्यामुळे रेड हार्ट आणि रेज फुलं इमोजी देखील या कायद्याच्या कक्षेत येतात.
सौदी अरेबियातील अँटी फ्रॉड असोसिएशनच्या सदस्याने निदर्शनास आणून दिले की, कायद्याचे वारंवार उल्लंघन झाल्यास, 300,000 सौदी रियाल (सुमारे 59,70,984 रुपये) पर्यंत पोहोचू शकतो.