पाकिस्तानाचे (pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. तोषखाना प्रकरणात (Toshkhana case) दोषी ठरल्यापासून इम्रान खान (imran khan) यांना प्रचंड रोष सहन करावा लागत आहे. लाहोरमध्ये (lahore) जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी गेलेल्या इम्रान खान यांच्याविरोधातही आता लोकांनी घोषणाबाजी केली आहे. लोकांना त्यांच्याविरोधात घड्याळ चोर (ghadi chor) अशी घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या घोषणाबाजीवर इम्रान खान यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पंतप्रधान शहबाज शरीफ (shahbaz sharif) यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनाही याआधी चोर (thief) म्हणून संबोधण्यात आले होते. मात्र आता इम्रान खान (imran khan) यांच्यावरही अशीच टीका होऊ लागली आहे. (Imran Khan ghadi chor sloganeering against former Prime Minister of Pakistan in Lahore rally)
परदेशी भेटवस्तू विकल्याचा आरोप
तोषखान्यामध्ये पंतप्रधानांना सन्मान म्हणून मिळालेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. यामध्ये अनेक मूल्यवान वस्तू देखील असतात. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने तोषखाना प्रकरणी माजी पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले आहे. खान यांच्यावर पंतप्रधान असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. इम्रान खान 2018 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. अरब देशांच्या दौऱ्यांमध्ये त्यांना तेथील राज्यकर्त्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्यांना अनेक युरोपीय देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडून अनमोल भेटवस्तूही मिळाल्या होत्या. त्या इम्रान खान यांनी तोशाखान्यात जमा केल्या होत्या. पण नंतर इम्रान खान यांनी त्या तोशाखान्यातून स्वस्तात विकत घेतल्या आणि मोठ्या नफ्याने विकल्या. त्यांच्या सरकारने या संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर परवानगी दिली होती. इम्रान खान यांनी एकूण 5.8 कोटींचा नफा कमावल्याचा आरोप होता. या प्रकरणी इम्रान खान यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानंतर इम्रान खान गुरुवारी लाहोरला पोहोचले होते. ते जाहीर सभेला संबोधित करणार होते. मात्र कार्यक्रमात पोहोचताच अनेकांनी इम्रान खान यांना घड्याळ चोर असे म्हटले. बराच वेळ अशी घोषणाबाजी सुरू होती. इम्रान खान यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्याचा हा प्रकार यापूर्वीही पाहायला मिळाला आहे. त्यांची अशी काही विधानेही समोर आली आहेत, ज्यामुळे ते अडचणीत आले आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान Imran Khan घड्याळ चोर?
इम्रान खान दिसताच पाकिस्तानच्या नागरिकांनी दिल्या घड्याळ चोरच्या घोषणा...#viralvideo #pakistan #Imrankhan pic.twitter.com/B8wAAPg8rm— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 28, 2022
दरम्यान, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 21 ऑक्टोबर रोजी तोषखाना प्रकरणात इम्रान खान यांना 5 वर्षांसाठी अपात्र ठरवले होते. त्यांचे संसद सदस्यत्वही रद्द करण्यात आले. या निर्णयानंतर इम्रान खान पुढील 5 वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. तोशाखान्यात जमा केलेल्या भेटवस्तू त्याने स्वस्तात विकत घेतल्या आणि चढ्या भावात विकल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर होता.