अमेरिकन स्ट्राईक : ड्रोन हल्ल्यांत २७१४ पाकिस्तानी ठार

तहरीक ए पाकिस्तानचा वरिष्ठ नेता अशाच एका ड्रोन हल्ल्यात ठार झाला

Updated: Nov 10, 2018, 11:48 AM IST
अमेरिकन स्ट्राईक : ड्रोन हल्ल्यांत २७१४ पाकिस्तानी ठार  title=

इस्लामाबाद : अमेरिकेनं पाकिस्तानात दहशतवाद्यांना टार्गेट करत जानेवारी २००४ पासून आत्तापर्यंत जवळपास ४०९ ड्रोन हल्ले केलेत. या हल्ल्यांत २७१४ पाकिस्तानी ठार झालेत तर ७२८ जण जखमी झालेत. 'डॉन'मध्ये शुक्रवारी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, सीआयए संचालित या ड्रोननं बजाऊर, बानू, हांगू, खैबर, खुर्रम, मोहम्मद, उत्तर वजीरिस्तान, मुश्की, ओरक्जई आणि दक्षिण वजीरिस्तानात हल्ले केलेत. 

सर्वात जास्त ड्रोन हल्ले २००८ ते २०१२ दरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) सत्तेत झालेत. नॅशन काऊटंर टेररिजम ऑथोरिटीच्या (नाक्टा) सूत्रांच्या हवाला देत वर्तमानपत्रानं ही माहिती दिलीय. या काळात ३३६ हवाई हल्ल्यांत २२८२ जण ठार झाले तर ६५८ जण जखमी झाले, असंही यात म्हटलं गेलंय. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ २०१० मध्ये ११७ हल्ल्यांत झाले. यात ७७५ जण ठार झाले तर १९३ जण जखमी झाले. 


मुल्ला अख्तर मन्सूर

पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाजच्या (पीएमए-एल) कार्यकाळात २०१३ पासून २०१८ पर्यंत ६५ ड्रोन हल्ले झाले. यात ३०१ जण ठार झाले तर इतर ७० जण जखमी झाले. 

तर २०१८ मध्ये २ ड्रोन हल्ले झालेत यात एक व्यक्ती ठार झाला आणि एक जखमी झाला. 

तहरीक ए पाकिस्तानचा वरिष्ठ नेता अशाच एका ड्रोन हल्ल्यात ठार झाला. तालिबान प्रमुख मुल्ला अख्तर मन्सूरचाही ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्याची पुष्टी झालीय.