India at UN: भारताने पाकिस्तानला खडसावले

India at UN: संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मंचावरुन भारताने (India) पाकिस्तानला ( Pakistan) चांगलेच खडसावले आहे.  

Updated: Sep 25, 2021, 01:19 PM IST
India at UN: भारताने पाकिस्तानला खडसावले title=
File image (Source: Twitter)

लंडन : India at UN: संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मंचावरुन भारताने (India) पाकिस्तानला ( Pakistan) चांगलेच खडसावले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख (Jammu and Kashmir and Ladakh) भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहणार, असे भारताने स्पष्ट शब्दात बजावले आहे. पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरचा मुद्द्यावर भाष्य करण्यात आले आहे. यावेळी भारताने आपली स्पष्ट भूमिका बजावली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला आज संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरसंदर्भात केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानवर हल्लाबोल करताना दहशतवाद्यांना आश्रय देणं, मदत करणं आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत असल्याचे म्हटले आहे.

यावरच न थांबता पाकिस्तानने अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचे ठणकावून सांगितले आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर, 'जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि भविष्यातही कायमच तसाच राहील, असे पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.