चीनमध्ये लॉकडाऊन, फ्रान्समध्ये रुग्णालय फूल, जर्मनी-यूकेत परिस्थिती चिंताजनक, भारतात काय आहे परिस्थिती?

Covid 19 प्रकरणं पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अनेक देशांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे.

Updated: Mar 29, 2022, 04:10 PM IST
चीनमध्ये लॉकडाऊन, फ्रान्समध्ये रुग्णालय फूल, जर्मनी-यूकेत परिस्थिती चिंताजनक, भारतात काय आहे परिस्थिती? title=

Covid 19 cases : चीन, दक्षिण कोरिया, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनीसह अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर शांघायमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लोकांना फक्त कोरोना चाचणीसाठीच घराबाहेर पडता येणार आहे. फ्रान्समध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. दक्षिण कोरियामध्येही रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ओमायक्रॉनचा उप-प्रकार BA.2 मुळे संसर्ग वाढत आहे.

चीनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ओमायक्रॉनचा BA.2  सब-व्हेरिएंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे. शांघायमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आलाय. सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. लोकं घरामध्ये कैद झाली आहेत.

फ्रान्समध्ये रुग्णालये भरु लागली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत 21,073 रुग्णांची वाढ झाली आहे.

जर्मनीमध्ये ही संसर्ग वाढत आहे. गेल्या 24 तासांत 237352 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 307 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण कोरियामध्ये मृतांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत 3.5 लाख रुग्णांची वाढ झाली आहे.

ब्रिटनमध्येही स्थिती बिकट आहे. गेल्या 24 तासांत 2,15,001 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तसेच 217 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे. भारतात कोरोनाचा धोका अजूनही वाढलेला नाही. मंगळवारी 1,259 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे.