भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूवर अमेरिकन पोलिसाला हसू आवरेना, VIDEO पाहून तुमचाही होईल संताप

Jaahnavi Kandula Death: भारतातील आंध्र प्रदेश येथे राहणाऱ्या जान्हवी कंडुला हिचा अमेरिकेत रस्ते अपघातात मृत्यू झाला. मात्र, तिच्या मृत्यूनंतर घडलेल्या घडामोडींमुळं हे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 14, 2023, 11:24 AM IST
 भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूवर अमेरिकन पोलिसाला हसू आवरेना, VIDEO पाहून तुमचाही होईल संताप title=
India Seeks Probe After US Cops Caught Joking Over indian student accidental death

Jaahnavi Kandula Death: भारतीय वंशाची विद्यार्थ्यिनी जान्हवी कंडुला हिचा अमेरिकीत रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. जानेवारी महिन्यात जान्हवीला ज्या कारने धडक दिली होती ती स्थानिक पोलिसांची होती. ही घटना समोर येताच भारताने अमेरिकेकडे पोलिसाच्या बॉडीकॅमच्या फुटेजची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर, ज्या पोलिसाच्या भरधाव कारने जान्हवीला धडक दिली तोच तिच्या मृत्यूवर हसताना दिसत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

भारतीय वाणिज्य दूतावासने रस्ते अपघात दुर्घटनेनंतर जान्हवी कंडुलाच्या मृत्यूप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी तसं ट्विट केले आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या लोकांविरोधात सखोल चौकशी आणि कारवाई केली जावी यासाठी वॉशिंगटनच्या स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आम्ही संपर्क केला आहे. वाणिज्य दुतावास आणि दुतावास सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणी लक्ष ठेवून आहोत, असं ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 

जान्हवी कंडुलाचा जानेवारीमध्ये अपघात झाला होता. ज्या वाहनाने जान्हवीला धडक दिली ती पोलिसांची कार असून अधिकारी केविन डेव त्यावेळी कार चालवत होता. या अपघातात भारतीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. हाती आलेल्या माहितीनुसार, केविन त्यावेळी 120 किलोमीटर प्रती तास या वेगाने गाडी चालवत होता. अपघातानंतर घटनास्थळावरुन एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या बॉडीकॅममध्ये घटनास्थळावरील काही क्षण चित्रित झाले आहेत. यात पोलिसच भारतीय विद्यार्थिनीच्या अपघाती मृत्यूवर हसताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारताकडून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सोमवारी पोलिसांकडून बॉडीकॅमचा व्हिडिओ जारी करण्यात आला होता. यात अधिकारी डेनिअल ऑडेरर या घटेवर वारंवार हसताना दिसत आणि आरोपी डेवची चौकशी करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे. यावर भारताने कठोर पावलं उचलत अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. ही घटना अस्वस्थ करणारी असून जान्हवी कंडुलाच्या मृत्यूवर अशाप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करता येणार नाही, असं ठणकावून सांगितलं आहे. 

दरम्यान, पोलिसांकडून मागील महिन्यात एक रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यात म्हटलं आहे की डेव 74 मील प्रती तास वेगाने गाडी चालवत होता आणि कारने जान्हवीला धडक दिल्यानंतर ती 100 फूटपेक्षा अधिक लांब फेकली गेली. जान्हवी कंडुला ही आंध्र प्रदेश येथील रहिवाशी होती. तर, नॉर्थ ईस्टर्न विद्यापिठातून ती मास्टर डिग्रीचे शिक्षण घेत होती.