दाऊद पाकिस्तानात, संयुक्त राष्ट्राने तातडीने कारवाई करावी - भारत

दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही पाकिस्तानमध्ये त्याला सुरक्षित आसरा.

PTI | Updated: Jul 10, 2019, 11:08 AM IST
दाऊद पाकिस्तानात, संयुक्त राष्ट्राने तातडीने कारवाई करावी - भारत title=

न्यूयॉर्क : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही पाकिस्तानमध्ये त्याला सुरक्षित आसरा दिला जातोय, यावर संयुक्त राष्ट्रांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भारताने केली आहे. दाऊद इब्राहिम हा केवळ भारतासाठी धोकादायक नसून त्याचे आणि त्याच्या डी कंपनीचे गुन्हेगारी जाळं जगभरात पसरलेलं असून अनेक गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांना तो प्रवृत्त करत आहे, तसंच त्याचे अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याकडेही भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे. 

जागतिक स्तरावर दहशतवाद आणि संघटीत गुन्हेगारीचा प्रयत्न दाऊदच्या डी कंपनी गॅंगकडून केला जात आहे. हे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी आणि जागतिक शांततेसाठी तसेच सुरक्षेसाठी एकदम धोकादायक आहे. दाऊदला मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचेवेळी दाऊदच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. जगात डी कंपनीचे धोकादायक दहशतवादी जाळे पसरण्याचे काम सुरुच आहेत. याची सविस्तर माहिती भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिली आहे. युनायटेड नेशन्य (यूएन)च्या सुरक्षा परिषदेत बैठकीत संयुक्त राष्ट्रसंघाचे भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली. 

२५ वर्षांमध्ये एवढा बदलला दाऊद

EXCLUSIVE: २५ वर्षांमध्ये एवढा बदलला दाऊद, पाकिस्तानमधला फोटो समोर

दरम्यान, मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २५ वर्षांपासून फरार आहे. पाकिस्तानमध्ये लपलेल्या दाऊदच्या प्रत्यर्पणाचा मुद्दा भारत नेहमी उचलतो. पण पाकिस्तान मात्र दाऊदला संरक्षण देत नाही, असे सांगितले जाते. मात्र, हे चुकीचे आहे. पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दाऊद इब्राहिमचा नवा फोटो गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला आहे.

दाऊद इब्राहिम डी नेटवर्कचं आंतरराष्ट्रीय नेटवर्क पाहणाऱ्या जाबिर मोतीवालला भेटतानाचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये दाऊद ठणठणीत असल्याचेदिसत आहे. दाऊदच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिले होते. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार जाबिर मोतीवाला दाऊदच्या कराचीमधल्या क्लिफंटन हाऊसच्या जवळच राहतो.

दरम्यान, जाबिर मोतीवाला याला ब्रिटनमध्ये अटक झाली. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआय ब्रिटनमधून मोतीवालाचे प्रत्यर्पण करण्याचा प्रयत्न करत आहे. एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार दाऊद कराचीमध्येच असल्याचे जाबिर मोतीवालने म्हटले आहे.