बलाढ्य देशांसोबत युद्ध अभ्यास करणार भारतीय हवाईदल

भारत आणि इस्राईल यांच्यातील मैत्री आता अजून घट्ट होतांना दिसत आहे. भारतीय वायुदल प्रथमच इस्रायली वायुसेनेसोबत संयुक्त युद्ध अभ्यास करणार आहे. इस्राईलमध्ये गुरुवारपासून सुरू होणा-या "ब्लू फ्लॅग -17" मध्ये भारतीय हवाई दलाचे 45 सदस्य सहभागी होणार आहे. संयुक्त युद्ध अभ्यासात अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी यांच्याव्यतिरिक्त भारत, इस्राईलच्या सैन्यांचा समावेश असेल.

Updated: Nov 1, 2017, 11:54 AM IST
बलाढ्य देशांसोबत युद्ध अभ्यास करणार भारतीय हवाईदल title=

नवी दिल्ली : भारत आणि इस्राईल यांच्यातील मैत्री आता अजून घट्ट होतांना दिसत आहे. भारतीय वायुदल प्रथमच इस्रायली वायुसेनेसोबत संयुक्त युद्ध अभ्यास करणार आहे. इस्राईलमध्ये गुरुवारपासून सुरू होणा-या "ब्लू फ्लॅग -17" मध्ये भारतीय हवाई दलाचे 45 सदस्य सहभागी होणार आहे. संयुक्त युद्ध अभ्यासात अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी यांच्याव्यतिरिक्त भारत, इस्राईलच्या सैन्यांचा समावेश असेल.

या संयुक्त एरियल ड्रिलमध्ये भारतीय वायुसेनेचे सी 130 जे स्पेशल ऑपरेशनल एअरक्राफ्ट गरुण कमांडो सहभागी होणार आहेत. 2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान हा अभ्यास सुरु राहणार आहे. हा इतिहासातील सर्वात मोठा संयुक्त युद्धअभ्यास असल्याचं म्हटलं जातंय.

पाकिस्तान आणि चीन ब्लूफ्लॅग-17 युद्धअभ्यासात सहभागी होऊ इच्छित होता पण त्यांना परवानगी नाही मिळाली. इस्रायलमध्ये पाकिस्तानी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी आहे. दुसरे, या युद्धअभ्यासाचा हेतू चीन आणि पाकिस्तानच्या हेतूशी जुळत नाही. इस्रायली कमांडरने उधमपूरमधील कमांड मुख्यालयाला भेट दिली.