close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लडाखमध्ये भारत - चीनच्या सैन्यात धक्काबुक्की प्रकार

 भारत आणि चीनच्या सैन्यात धक्काबुक्की. 

ANI | Updated: Sep 14, 2019, 02:44 PM IST
लडाखमध्ये भारत - चीनच्या सैन्यात धक्काबुक्की प्रकार
संग्रहित छाया

नवी दिल्ली : एकीकडे पाकिस्तानसोबत तणावाचे वातावरण असताना बुधवारी भारत आणि चीनच्या सैन्यात धक्काबुक्की झाल्याचा प्रकार लडाखमध्ये घडला. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बराच वेळ हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. १३४ किलोमीटर लांबीच्या पॅगाँग लेकच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला. 

भारतीय सैनिक गस्त घालत असताना त्यांचा सामना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांशी झाला. दरम्यान या क्षेत्रात भारतीय सैनिकांच्या गस्त घालण्याला चीनच्या सैनिकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला.  

दरम्यान, तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांचे सैन्य ब्रिगेडीअर स्तरावरील अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी तयार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तणाव कमी करण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे.