अमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या घालून हत्या

अमेरिकेत भारतीयाची गोळ्या घालून हत्या

Updated: Jun 11, 2018, 02:35 PM IST
अमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या घालून हत्या

नवी दिल्ली : अमेरिकेत आणखी एका भारतीयाची हत्या करण्यात आली आहे. अटलांटामध्ये 48 वर्षीय हरिकृष्णा उर्फ हरीश मिस्त्री यांची एका आफ्रिकी-अमेरिकन व्यक्तीने शनिवारी 3 गोळ्या गालून हत्या केली. गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हरीश हे गुजरातचे राहणारे आहेत. घटनेच्या वेळी हरीश त्यांच्या दुकानावर होते. आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. हरीश हे वडोदराचे राहणारे आहेत. 

रविवारी सकाळी हरीश यांच्या हत्येची माहिती मिळाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. ज्याने हरीश यांना गोळी मारली तो आधी हरीश यांच्या दुकानावरच काम करत होता. पण व्यवहार चांगला नसल्यामुळे त्याला हरीश यांनी कामावरुन काढून टाकले होते. हरीश 15 वर्षांपूर्वी अमेरिकेला गेले होते. अमेरिकेत त्यांचं गॅस स्टेशन स्टोर आहे. त्यांच्या परिवारात एक पत्नी, 19 वर्षाची मुलगी आणि चार वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या 2 बहिणी देखील अमेरिकेत राहतात.