Father Of Girl Child: आज 'इंटरनेशन डे ऑफ गर्ल चाइल्ड' (International Day of Girl Child). मुलीच्या जन्मामुळं आमचं आयुष्य सार्थकी लागलं असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. किंबहुना तुम्हालाही आता हे वाचताना यामध्ये अतिशयोक्ती वाटत नसावी. कारण, मुलीच्या जन्मानं बऱ्याच गोष्टी बदलतात, आयुष्यात नवी वळणं आणि जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडण्याची संधी मिळते. काही वर्षांपूर्वी मुलगा आणि मुलीमध्ये जो भेदभाव होत होता तो आता बऱ्याच अंशी दूरही होताना दिसत आहे. तुम्ही ऐकलं असेल की वडिलांचा त्यांच्या लेकीवर प्रचंड जीव असतो. किंबहुना हीच लेक वडिलांचं आयुष्यही वाढवते, हे माहितीये का? (International Day of Girl Child fathers age increases after daughters birth)
मुलीचा जन्म (Girl child birth) झाल्यानंतर तिच्या वडिलांचं आयुष्य जवळपास 74 आठवड्यांनी वाढतं. इतकंच नाही, तर लेकिच्या असण्यानेच संपूर्ण कुटुंबात आनंदाची बरसात होते. कोणत्याही उथळ संदर्भावर नव्हे तर एका निरीक्षणातून ही बाब समोर आली आहे.
पोलंडच्या जेगीलोनियन विद्यापीठात (jagiellonian university) करण्यात आलेल्या एका निरीक्षणपर संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे की, मुलीच्या जन्मामुळे वडिलांचं आयुष्य 74 आठवड्यांनी वाढतं. मुलाच्या जन्मामुळं आयुर्मानात कोणताही बदल होत नाही. संशोधनादरम्यान ही बाब समोर आली की, गरोदरपणादरम्यानच लेकिशी वडिलांचं असणारं नातं दृढ होऊ लागतं.
अमेरिकन जर्नल ऑफ ह्यूमन बायोलॉजीनंही (american journal of human biology) यासंदर्भातील निरिक्षण केल्यास त्यांच्या ही बाब लक्षात आली, की मुलीच्या जन्मामुळं वडिलांची कार्यक्षमता वाढते. मुलीचं वडिलांसोबत असण्याची वेळ आणि मुलाचं त्यांच्यासोबत असण्याची वेळ या दोन्हीमध्ये मेंदूला मिळणाऱ्या Signal मध्येही बरीच तफावत दिसते असं निरीक्षण अमेरिकन साइकोलॉजिकल एसोसिएशन जर्नल बिहेवियरल न्यूरो सायन्सनं नोंदवलं.
मुलीच्या लहानसहान गोष्टी वडिलांना आनंद देत असतात. ज्यामुळं मेंदुमध्ये happy hormones चं प्रमाण वाढतं. शिवाय मुलांच्या तुलनेत मुलींसमोर वडील सहजपणे मन मोकळं करतात असंही सदर निरीक्षणांतून सिद्ध झालं. सदर संशोधनपर निरीक्षणांसाठी काही व्यक्तींच्या मेंदूचा MRI सुद्धा काढण्यात आला होता.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.