30 दिवस पाण्यात राहून सुद्धा फोन खराब होत नाही, यावर तुमचा विश्वास बसेल?

असा फोन विकत घेण्याचा पर्याय तुम्हाला मिळाला, तर तुम्हाला तो खरेदी करायला आवडेल का?

Updated: Mar 31, 2021, 04:20 PM IST
30 दिवस पाण्यात राहून सुद्धा फोन खराब होत नाही, यावर तुमचा विश्वास बसेल? title=

मुंबई : कधी जर तुमचा फोन नदी तलावा किंवा पाण्यामध्ये पडला तर, तुमची फोनला पाहूण काय प्रतिक्रिया असेल? तुम्हाला वाटेल की, आता हा फोन काही चालायचा नाही. पण जर तुम्हाला सांगितलं की, एक असाही फोन आहे जो एक महिना पाण्यात राहून सुद्धा खराब होत नाही, आणि असा फोन विकत घेण्याचा पर्याय तुम्हाला मिळाला, तर तुम्हाला तो खरेदी करायला आवडेल का?

हा फोन कोणताही नवीन आलेला फोन नाही, तर हा आयफोन 11 Proआहे. आता हे खरोखरच शक्य आहे की नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काही महिने पाण्यात गेल्यानंतरही आयफोन 11 प्रो कार्य करेल? तुम्ही याचा पुरावा मागाल. तर हो, याचा पुरावा देखील आहे.

कॅनडाच्या सीटीव्ही न्यूजने दिलेल्या अहवालानुसार, 50 वर्षीय कॅनेडियन महिला एंजी कॅरीयर (Angie Carriere) हिचा फोन एक महिना तलावामध्ये पडून होता. परंतु तो खराब झाला नाही.

कॅनडामध्ये राहणारी ही महिला आपल्या वाढदिवशी तलावामध्ये मासेमारी करण्यासाठी गेली होती. मासे पकडताना महिलेचा आयफोन 11 प्रो चुकून तलावामध्ये पडला. महिलेनी असा विचार केला की, आता हा फोन काही परत मिळू शकत नाही आणि जरी मिळाला तरी तो चालण्याच्या परिस्थिती तर नक्कीच नसणार म्हणून मग ती निराश होऊन घरी परतली.

फोन 30 दिवस तसाच पाण्यात पडून राहिला होता, या घटनेच्या ठीक 30 दिवसानंतर या महिलेच्या लक्षात आले की, त्या फोनमध्ये तिच्या कुटूंबाचे अनेक फोटो आणि आठवणी आहेत. त्यानंतर एंजी कॅरीयरने (Angie Carriere) तिचा आयफोन 11 प्रो तलावाच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि मच्छीमारांच्या मदतीने त्या महिलेने आपला फोन तलावातून बाहेर काढला.

आता सर्वात मोठा प्रश्न हा होता की, तो फोन ठीक आहे?, तो आधीप्रमाणे चालवू शकणार आहे का?, एंजीने तो आयफोन 11 प्रो तपासला आणि तो अगदी पूर्वी सारखा काम करत आहे याची खात्री केली. याचा अर्थ असा की, फोन 30 दिवस पाण्यात राहिल्यानंतर अजूनही उत्तम प्रकारे काम करत होता.

पाण्यातून बाहेर पडल्यानंतरही आयफोन योग्यरित्या कार्य करीत आहे. परंतू ही पहिली वेळ नाही. हे यापूर्वीही बर्‍याचदा घडले आहे. एकदा iPhone XS बद्दलही अशी बातमी समोर आली होती.